‘तारक मेहता..’च्या दिलीप जोशी यांच्या घराबाहेर 25 लोक हत्यारं, बॉम्ब घेऊन उभे; अलर्ट जारी!

| Updated on: Mar 03, 2023 | 10:08 AM

त्या व्यक्तीने कॉल करून सांगितलं की 'तारक मेहता..' मालिकेत जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी यांच्या घराबाहेर शिवाजी पार्कात 25 लोक बंदूक आणि बॉम्ब घेऊन उभे आहेत.

तारक मेहता..च्या दिलीप जोशी यांच्या घराबाहेर 25 लोक हत्यारं, बॉम्ब घेऊन उभे; अलर्ट जारी!
Dilip Joshi
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील जेठालाल म्हणजेच अभिनेते दिलीप जोशी यांच्याविषयी धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिलीप यांच्या घराबाहेर 25 लोक बंदूक, हत्यारं आणि बॉम्ब घेऊन उभे आहेत, असं एका अज्ञात व्यक्तीने फोन करून नागपूर कंट्रोल रुमला सांगितलं. ही माहिती पोलिसांना देणाऱ्या व्यक्तीने त्याचं नाव कटके असं सांगितलं आहे. एका व्यक्तीने 1 फेब्रुवारी रोजी कटके असं नाव सांगत नागपूर कंट्रोल रुमने कॉल केला होता. त्या व्यक्तीने कॉल करून सांगितलं की ‘तारक मेहता..’ मालिकेत जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी यांच्या घराबाहेर शिवाजी पार्कात 25 लोक बंदूक आणि बॉम्ब घेऊन उभे आहेत.

इतकंच नव्हे तर त्या अज्ञात व्यक्तीने कॉलवर असंही सांगितलं की, त्याने काही लोकांना बोलताना ऐकलं की ते मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचीही घरं बॉम्बने उडवणार आहेत. त्यासाठी 25 लोक शहरात आले आहेत. ही माहिती मिळताच नागपूर कंट्रोल रुमने शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला अलर्ट केलं आणि एफआयआर दाखल करण्यास सांगितलं. त्याचसोबत याचा तपास करण्यास सांगण्यात आलं. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

तपासानंतर असं लक्षात आलं की ज्या नंबरवरून नागपूर कंट्रोल रुमला कॉल करण्यात आला होता, तो मुलगा दिल्लीच्या एका सिम कार्ड कंपनीत काम करतो. मात्र त्या व्यक्तीचा यात कोणताही सहभाग नव्हता. त्या मुलाच्या नंबरचा वापर त्याच्या माहितीशिवाय स्पूफ करून एका ॲपद्वारे कॉल करण्यात आला होता. पोलीस आता त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहे.

हे सुद्धा वाचा

याआधीही एका कॉलद्वारे मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांची घरं बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने अंबानी कुटुंबीयांना देशापासून परदेशापर्यंत झेड प्लस सुरक्षा दिली होती. कोर्टाने असंही स्पष्ट केलं होतं की परदेशातील या सुरक्षेचा खर्च अंबानीच उचलतील.