AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तारक मेहता..’च्या बबिताला काय झालं? 10 दिवसांपासून रुग्णालयात ये-जा, भावूक होत म्हणाली..

अभिनेत्री मुनमुन दत्ता गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर सक्रिय नाही. ती मालिकेतही दिसत नसल्याने चाहत्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. आता मुनमुनने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित त्यामागचं कारण सांगितलं आहे.

'तारक मेहता..'च्या बबिताला काय झालं? 10 दिवसांपासून रुग्णालयात ये-जा, भावूक होत म्हणाली..
Munmun DuttaImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 12, 2025 | 8:30 AM
Share

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत बबिताजीची भूमिका साकारून अभिनेत्री मुनमुन दत्ता घराघरात पोहोचली. मालिकेतील जेठालाल आणि बबिताजी यांच्यातील मजेशीर केमिस्ट्री प्रेक्षकांनाच खूप आवडते. परंतु गेल्या काही दिवसांपासून मुनमुन मालिकेत दिसत नसून सोशल मीडियावरही ती फारशी सक्रिय नाही. एरव्ही इन्स्टाग्रामवर सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करणाऱ्या मुनमुनने बऱ्याच दिवसांपासून काहीच पोस्ट केलं नाही. त्यामुळे चाहत्यांनी तिच्याविषयी काळजी व्यक्त केली होती. अखेर त्यामागचं कारण खुद्द मुनमुननेच सांगितलं आहे. मालिका आणि सोशल मीडियापासून दूर राहण्यामागचं कारण तिने नुकत्याच एका पोस्टद्वारे सांगितलं आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मुनमुनने स्वत:चा एक सेल्फी पोस्ट केला आहे. त्याचसोबत तिने तिच्या आईची प्रकृती ठीक नसल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. ‘हो, मी बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर सक्रिय नव्हते. माझ्या आईची प्रकृती ठीक नाही. गेल्या दहा दिवसांपासून मी रुग्णालयाच्या फेऱ्या मारतेय. सध्या तिची प्रकृती हळूहळू सुधारतेय आणि लवकरच ती पूर्णपणे बरी होईल अशी अपेक्षा करते. व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात समतोल राखणं खूप तणावाचं झालं आहे. यात मी खूप थकलेय, परंतु या कठीण काळात ज्या मित्रमैत्रिणींनी माझी मदत केली, त्यांची मी आभारी आहे. देवाची कृपा’, अशी पोस्ट तिने लिहिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘तारक मेहता..’ मालिकेतून जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी आणि बबिताजींची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता गायब असल्याने विविध चर्चांना उधाण आलं होतं. या दोघांनी मालिका सोडली की काय, असे प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारले जात होते. परंतु या दोघांनी वैयक्तिक कारणांसाठी रजा घेतल्याचं निर्माते असितकुमार मोदी यांनी स्पष्ट केलं होतं.

‘तारक मेहता..’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. अभिनेत्री मुनमुन दत्ता सुरुवातीपासून या मालिकेत काम करतेय. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा