हिमाचलमधील भूस्खलनादरम्यान थोडक्यात बचावले प्रसिद्ध अभिनेते; सांगितला धक्कादायक प्रसंग

| Updated on: Aug 22, 2023 | 7:35 PM

राकेश बेदी हे अलीकडेच 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटात झळकले होते. त्यांनी सनी देओलच्या 'गदर 2' या चित्रपटातही भूमिका साकारली आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतोय.

हिमाचलमधील भूस्खलनादरम्यान थोडक्यात बचावले प्रसिद्ध अभिनेते; सांगितला धक्कादायक प्रसंग
Rakesh Bedi
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 22 ऑगस्ट 2023 : टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार राकेश बेदी यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतही भूमिका साकारली होती. आता नुकताच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या धक्कादायन घटनेचा खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वी ते हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या भूस्खलनात अडकले होते. त्यांच्या गाडीसमोर अचानक मोठा दगड कोसळला होता. त्या दगडाला रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न करताना त्यांचं बोट तुटलं. सोमवारी रात्री उशिरा त्यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला.

या व्हिडीओत राकेश म्हणाले, “शिमला, हिमाचल प्रदेशमध्ये कशा पद्धतीन भूस्खलन होत असतात, याबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. डोंगराळ भागात मोठमोठ्या दरडी कोसळतात. त्यामुळे रस्ते वाहतूक ठप्प होते. बरीच वाहनं यावेळी अडकतात. मी दोन आठवड्यांपूर्वी सोलानला गेलो होतो. तिथून परत येत असताना आम्हाला सांगितलं गेलं की भूस्खलनामुळे मुख्य रस्ता बंद आहे, तर तुम्ही शॉर्ट कटने जा. जेव्हा आम्ही शॉर्टकट घेतला तेव्हा थेट आमच्या गाडीसमोर डोंगरावरून मोठा दगड कोसळला. सुदैवाने तो दगड आमच्या गाडीवर कोसळला नाही.”

हे सुद्धा वाचा

“गाडीतून उतरून जेव्हा आम्ही तो दगड हटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या अंगठ्यावर दगड पडला. त्यामुळे माझ्या अंगठ्याला जखम झाली आणि त्याचा अर्धा भाग लटकू लागला. ती जखम खूप खोलवर होती. मात्र आता हळूहळू ते बरं होतंय. जर ही जखम आणखी थोडी मोठी असती तर थेट माझा अंगठाच वेगळा झाला असता”, असं ते पुढे म्हणाले.

राकेश बेदी हे अलीकडेच ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात झळकले होते. त्यांनी सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटातही भूमिका साकारली आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतोय. राकेश यांनी ‘भाभी जी घर पर है’ आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ यांसारख्या लोकप्रिय कॉमेडी मालिकांमध्येही काम केलं आहे.