TMKOC : ‘दिवाळी’ स्पेशल एपिसोडमध्ये दयाबेनची घरवापसी? दिशा वकानीच्या एण्ट्रीबाबतचं सत्य

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत दयाबेनची घरवापसी कधी होणार, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीने बाळंतपणासाठी मालिकेतून ब्रेक घेतला होता. मात्र पुन्हा ती मालिकेत परतलीच नाही.

TMKOC : दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये दयाबेनची घरवापसी? दिशा वकानीच्या एण्ट्रीबाबतचं सत्य
दिशा वकानी
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 16, 2025 | 3:33 PM

मुंबई : 18 नोव्हेंबर 2023 | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून गेल्या बऱ्याच काळापासून दयाबेन अर्थात अभिनेत्री दिशा वकानी गायब आहे. दिशा या मालिकेत कधी परतणार, असा प्रश्न अनेकांना चाहत्यांकडून केला जातो. त्यावर निर्मात्यांनी आजवर ठोस उत्तर दिलं नाही. आता पुन्हा एकदा सोनी सब टीव्हीवरील या मालिकेत दयाबेनच्या एण्ट्रीविषयी चर्चा रंगली आहे. दयाबेन खरंच मालिकेत लवकर परतणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र चर्चांमागील नेमकं सत्य काय आहे, ते जाणून घेऊयात..

‘तारक मेहता..’ या मालिकेतील गोकुलधाम सोसायटीत दिवाळीचा सण अत्यंत उत्साहाने आणि धूमधडाक्यात साजरा केला जातो. दिवाळीच्या आधी जेठालालचा मेहुणा सुंदर त्याला भेटण्यासाठी मुंबईला आला आहे. सुंदरने जेठालालला ही खुशखबर दिली आहे की दयाबेन दिवाळीनिमित्त मुंबईत येणार आहे. आपल्या पत्नीच्या परतण्याच्या बातमीनंतर जेठालाल आणि त्याचा गडा परिवार तिच्या स्वागताची तयारी करू लागला आहे. त्यामुळे मालिकेत आता खरंच दयाबेन येणार आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे.

नेमकं सत्य काय?

मालिकेत असं घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही सुंदरलालने अनेकदा भावोजी जेठालाल त्याची पत्नी दयाबेन मुंबईत येणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने दयाबेन येतच नाही. यंदाही दिवाळी दयाबेनचं मालिकेत परतणं कठीणच आहे. कारण अद्याप निर्माते असितकुमार मोदी आणि त्यांच्या टीमला दयाबेनच्या भूमिकेसाठी कोणती अभिनेत्रीच सापडली नाही. मात्र दयाबेन या पात्राशिवाय मालिका टीआरपीच्या यादीत चांगली कामगिरी करताना दिसतेय.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारलेली अभिनेत्री दिशा वकानी घराघरात लोकप्रिय आहे. दिशाने बाळंतपणासाठी मालिकेतून ब्रेक घेतला होता. मात्र ती पुन्हा सेटवर परतलीच नाही. गेल्या सहा वर्षांपासून मालिकेचे निर्माते तिला परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रेक्षकसुद्धा तिला परत आणण्याची जोरदार मागणी करत आहेत.

नवरात्रीच्या दिवसांत दिशा वकानीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये ती तिच्या पती आणि मुलासोबत दिसून आली होती. नवरात्रीमध्ये दिशा पारंपरिक गुजराती वेशभूषेत पहायला मिळाली होती. नवरात्रीच्याच एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी ती पती आणि मुलासोबत आली होती.