नवऱ्याने आयुष्य उद्ध्वस्त केलं… ‘तारक मेहता…’ फेम दयाबेनची अशी अवस्था पाहून चाहते चिंतेत

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: वैवाहिक आयुष्यात आनंदी नाही...'तारक मेहता...' फेम दयाबेनची लग्नानंतर झालीये अशी अवस्था..., लेकीसोबत 'तो' फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील बसेल मोठा धक्का...

नवऱ्याने आयुष्य उद्ध्वस्त केलं... तारक मेहता... फेम दयाबेनची अशी अवस्था पाहून चाहते चिंतेत
फाईल फोटो
| Updated on: Jul 05, 2025 | 8:17 AM

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत दयाबेन ही भूमिका साकारत अभिनेत्री दिशा वकानी हिने चाहत्याचं मनोरंजन केलं. पण 2017 मध्ये अभिनेत्रीने प्रेग्नेंसीच्या कारणामुळे मालिकेचा निरोप घेतला. पण त्यानंतर अभिनेत्री पुन्हा कधीच मालिकेत दिसली नाही. तेव्हा पासून चाहते दयाबेनच्या प्रतीक्षेत आहे. असित मोदी यांनी देखील अनेकदा दिशा वकानी हिला मालिकेत आणण्यासाठी प्रयत्न केले. पण त्याचा काही फायदा झाला नाही.

दिशा वकानी हिने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेच्या सुरुवाती पासून काम करण्यास सुरुवात केली. पण 2017 मध्ये तिने प्रसूती रजा घेतली आणि त्यानंतर दयाबेन कधीच मालिकेत परतली नाही. आई झाल्यानंतर दिशाने तिच्या कुटुंबाची आणि मुलांची काळजी घेण्यास सुरुवात केली आणि अभिनयापासून स्वतःला दूर ठेवलं.

वैवाहिक आयुष्यात आनंदी नाही दिशा वकानी – नेटकऱ्यांचा दावा

मालिकेत दिसत नसल्यामुळे दिशा वकानी हिची एक झलक मिळवण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता देखील दिशा वकानी हिचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिशा तिच्या लेकीसोबत दिसत आहे. पांढरे केस, चेहऱ्यावर पूर्वी सारखं नसलेलं तेज पाहिल्यानंतर दिशा तिच्या आयुष्यात नाही… असा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दिशा वकानी हिची चर्चा रंगली आहे.

 

 

दिशा वकानी हिचा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करत चिंता व्यक्त केली आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘नवऱ्यानं खरंच दिशा वकानीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे.’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘कशी झाली आहे ही आता…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘लग्न करुन पश्चाताप होत असेल, नवऱ्याने मोठ्या स्टारचं पूर्ण आयुष्य खराब केलं आहे.’ सध्या दिशाच्या वैवाहिक आयुष्याची चर्चा रंगली आहे.

दिशा वकानी हिचं लग्न

दिशा वाकानीने 2015 मध्ये चार्टर्ड अकाउंटंट मयूर पडियाशी लग्न केले. 2017 मध्ये तिने मुलगी स्तुतीला जन्म दिला आणि त्यानंतर 2022 मध्ये ती एका मुलाची आई झाली. दिशा वाकानीने कुटुंबासाठी तिचं करिअर पणाला लावलं. ती घरात पूर्णपणे गुंतलेली आहे.