TMKOC | ‘तारक मेहता…’ फेम मुनमुन दत्ता असं का म्हणाली? ‘काल रात्री…’

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील बबिताजी म्हणजे अभिनेत्री मुनमुन दत्ता हिचं मोठं वक्तव्य; म्हणाली, 'काल रात्री...', सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

TMKOC | ‘तारक मेहता...’ फेम मुनमुन दत्ता असं का म्हणाली? काल रात्री...
| Updated on: May 11, 2023 | 5:30 PM

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा…’ कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते. मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. टीआरपी यादीमध्ये देखील मालिका अव्वल स्थानी असते. मालिकेतील गोकूळ धाम सोसायटीमधील सर्वांची एकता आणि टप्पू सेना यांच्या मस्तीमुळे मालिकेने चाहत्यांच्या मनात राज्य केलं आहे. मालिकेतील सर्वात आवडती भूमिका म्हणजे जेठालाल आणि बबिताजी यांची आहे. मालिकेत बबिताजी या भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. शिवाय सोशल मीडिया देखील मुनमुन दत्ता कायम सक्रिय असते. सोशल मीडिया पोस्ट शेअर करत मुनमुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील अभिनेत्रीच्या एका पोस्टची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगत आहे.

मुनमुन दत्ता हिने ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा पाहिल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा पाहिल्यानंतर मुनमुन म्हणाली, ‘मी काल रात्री ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा पाहिला आहे… सिनेमा फार उत्तम आहे.. सिनेमाच्या कथेत कधी रंजक, भयानक तर कधी बिनधास्त वळण येताना दिसत आहेत. ‘

 

 

पुढे मुनमुन दत्ता म्हणाली, ‘असे सिनेमा करण्याचा प्रयत्न करण्याऱ्या सुदीप्तो सेन आणि विपूल अमृतलाल शाह यांना शुभेच्छा…अभिनेत्री अदा शर्मा हिने देखील उत्तम अभिनय करत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली आहे… गेल्या काही दिवलांपासून सर्वत्र ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.

अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’(The Kerala Story) सिनेमाची चर्चा सध्या तुफान रंगत आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तुफान चर्चा रंगली. शिवाय सिनेमाला विरोध देखील करण्यात आला. अनेक ठिकाणी सिनेमाचं प्रदर्शन देखील रोकण्यात आलं. एवढंच नाही तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी या सिनेमावर बंदी घालण्याची घोषणा केली. त्यांनी बंदी घोषित केल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. पण होणाऱ्या वादाचा कोणताही परिणाम सिनेमावर झाला नाही. आजही अनेक ठिकाणी सिनेमाला विरोध होत असल्याचं दिसून येत आहे. पण तरी देखील बॉक्स ऑफिसवर सिनेमा तगडी कमाई करताना दिसत आहे.

नक्की काय आहे ‘द केरळ स्टोरी’ ?

‘द केरळ स्टोरी’ सिनेमा त्या अहवालांवर आधारित आहे ज्यानुसार केरळमधील सुमारे ३२ हजार महिलांना बळजबरीने इस्लाममध्ये धर्मांतरित करण्यात आलं आणि अनेकांना ISIS अंतर्गत सीरियात नेण्यात आलं. सिनेमाचे निर्माते म्हणतात की हा सिनेमा सत्य घटनांवर आधारित आहे आणि त्यामुळे तो अनेक वादांनी घेरला आहे…. सध्या सर्वत्र ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.