‘तारक मेहता…’ मालिकेत कंजूस असलेला पोपटलाल खऱ्या आयुष्यात गडगंज संपत्ती मालक

'दुनिया हिला दुंगा...' म्हणणारा पोपटलाल कोट्यवधी रुपयांचा मालक; अभिनेत्याच्या संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क

तारक मेहता... मालिकेत कंजूस असलेला पोपटलाल खऱ्या आयुष्यात गडगंज संपत्ती मालक
'तारक मेहता...' मालिकेत कंजूस असलेला पोपटलाल खऱ्या आयुष्यात गडगंज संपत्ती मालक
| Updated on: Jan 03, 2023 | 3:09 PM

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah:’तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका आवडते. मालिकेतील टप्पू सेनेची मस्ती आणि गोकूळ धाम सोसायटीमध्ये राहत असलेल्या रहिवाश्यांमधील एकता चाहत्यांना प्रचंड आवडते. गेल्या १४ वर्षांपासून मालिका चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराचं खासगी आणि प्रोफेशनल आयुष्य चाहत्यांमध्ये कायम चर्चेचा विषय असतो. आता पोपटलाल म्हणजे अभिनेता श्याम पाठक कायम त्याच्या अभिनयामुळे चर्चेत असतो.

मालिके प्रत्येक ठिकाणी कंजूषपणा करणारा अभिनेता श्याम पाठक खऱ्या आयुष्यात मात्र गडगंज संपत्ती मालक आहे. मालिकेत साधा दिसणार पोपटलाल रॉयल आयुष्य जगतो. अभिनेत्याच्या संपत्तीचा आकडा जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, पोपटलाल उर्फ श्याम पाठक याच्याजवळ जवळपास १५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ‘तारत मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील एका एपिसोडसाठी अभिनेता जवळपास ६० हजार रुपये मानधन घेतो. गेल्या १४ वर्षांपासून अभिनेता मालिकेत काम करत आहे.

महत्त्वाचं म्हणजे, मालिकेत पोपटलाल लग्न होण्यासाठी जीवाचा आटापिटा करताना दिसतो. पण खऱ्या आयुष्यात मात्र अभिनेता आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. रिअल आयुष्यामध्ये अभिनेता वैवाहिक असून तीन मुलांचा वडील आहे. श्याम त्याचं खासगी आयुष्य कायम गुपित ठेवतो.

श्याम पाठकबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्याने स्वतःला फक्त मालिकांपर्यंत मर्यादित न ठेवता अनेक सिनेमांमध्ये देखील मुख्य भूमिका साकारली आहे. एवढंच नाही, तर श्यामने एका चिनी सिनेमात देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचं नाव लस्ट, कॉशन` (Lust, Caution) असं आहे.