Snehal Chandwadkar : ‘तारक मेहता…’ फेम भिडेच्या पत्नीनं घेतली अनिरुद्धाचार्य यांची भेट, म्हणाली, मुलांना सनातन धर्म…

Snehal Chandwadkar : 'तारक मेहता...' फेम मंदार चांदवडकर यांची पत्नी अभिनेत्री स्नेहल चांदवडकरनं अनिरुद्धाचार्य महाराज यांच्या वृंदावन येथील आश्रमाला भेट दिली.

Snehal Chandwadkar : तारक मेहता... फेम भिडेच्या पत्नीनं घेतली अनिरुद्धाचार्य यांची भेट, म्हणाली, मुलांना सनातन धर्म...
| Updated on: Nov 28, 2026 | 6:24 PM

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत आत्माराम तुकाराम भिडे ही भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेले अभिनेते मंदार चांदवडकर कायमच चर्चेत असतात. मात्र, यावेळी मंदार नव्हे, तर त्यांची पत्नी स्नेहल चांदवडकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. अनिरुद्धाचार्य महाराज यांच्या वृंदावन येथील आश्रमाला भेट दिल्यानंतर स्नेहल भावुक झाली. आश्रमातील वृद्ध महिलांची भेट घेतल्यानंतर तिला अश्रू अनावर झाले.

वृद्धाश्रमातील महिलांना पाहून स्नेहल भावुक

Loading...

स्नेहल चांदवडकरनं नुकतीच वृंदावन येथील अनिरुद्धाचार्य महाराज यांच्या कथा वाचन आणि संवाद कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर तिनं महाराजांच्या ‘गौरी गोपाल वृद्धाश्रम’ला भेट दिली. या आश्रमात राहणाऱ्या वृद्ध महिलांशी संवाद साधताना आणि त्यांचं आयुष्य जवळून पाहताना स्नेहल भावुक झाली. या अनुभवाबद्दल अनिरुद्धाचार्य महाराजांशी बोलताना अभिनेत्री म्हणाली, ‘खरं तर मी नेहमीच खूप बडबड करते, पण आश्रमात आल्यानंतर माझ्याकडे बोलायला शब्दच उरले नाहीत. केवळ डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तिथल्या लोकांना भेटून आणि गौरी गोपालची सेवा करून मला खूप समाधान वाटलं.’

 

या भेटीदरम्यान मंदार चांदवडकर आणि त्यांचा मुलगा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून स्नेहलसोबत जोडलेले होते. आश्रमातील वातावरण आणि तेथील वृद्ध महिलांचं आयुष्य पाहून त्यांच्या मुलगाही भावुक झाला. स्नेहलनं सांगितलं की, मुलांना सहसा सत्संग किंवा आध्यात्मिक गोष्टींसाठी फारसा वेळ नसतो. मात्र, गौरी गोपाल आश्रमाबद्दल समजल्यानंतर त्याला आश्चर्य वाटलं. त्यानं लगेचच गुगलवर अनिरुद्धाचार्य महाराजांविषयी माहिती शोधली. ‘तू इतक्या मोठ्या व्यक्तीशी संवाद साधला आहे’, असं म्हणत त्यानं आश्चर्य व्यक्त केलं. मुलांना सनातन धर्म आणि संस्कारांची माहिती देणं ही पालकांची जबाबदारी आहे. यात आपल्याकडून कुठेतरी थोडी कमतरता राहिली असावी, अशी कबुलीही स्नेहलनं दिली.

पुढे, अनिरुद्धाचार्य महाराजांनी मंदार चांदवडकर आणि त्यांच्या मुलालाही एकदा आश्रमात घेऊन येण्यास सांगितलं. यावेळी मुलांच्या संगोपनाबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी पालकांना मोलाचा सल्ला दिला. मुलं ही ओल्या मातीसारखी असतात; त्यांना जसा आकार दिला जाईल, तशी ती घडतात. शिक्षणासोबतच मुलांना सनातन धर्म, संस्कार आणि परंपरांची ओळख करून देणं हे पालकांचं कर्तव्य आहे, असं ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us