
Munmun Dutta : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका भारतातील सर्वात प्रसिद्ध मालिका आहे. गेल्या काही वर्षात मालिकेत अनेक चढ – उतार आले. अनेकांनी मालिकेचा निरोप घेतला. पण जून सर्व कलाकार आजही चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेत असतात. मालिकेत बबीता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमून दत्त हिला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. आजही मुनमून तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, मुनमून हिने स्वतःच्या खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.
मुनमून हिने लव्हलाईफ आणि लग्नावर मोठं वक्तव्य केलं.. आयुष्यात असं काय झालं ज्यामुळे अभिनेत्रीचं कोणतंच नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. मुनमून हिने ब्रेकअपचा खुलासा केला. ज्या ठिकाणी मला गोष्टी चांगल्या वाटत नाही, तेथून मी वेगळी झाले… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुनमून हिने वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
मुनमून दत्ता म्हणाली, ‘मी माझ्या नात्यासाठी प्रचंड मेहनत घेत असते. पण जेव्हा मला कळतं की, समोरून मला प्रेम मिळत नाही… तेव्हा मी त्या नात्यातून स्वतःला बाजूला करते. असं कधीच झालं नाही की, मी समोरच्याला फोन केला आणि सांगितलं मला ब्रेकअप करायचं आहे. जर माझं नातं तीन वर्षांचं असेल तर, मी दोन वर्ष नातं सांभाळण्यासाठी देते.’
‘नात्यात एकदम मागे जाणं मला आवडत नाही. ब्रेकअपची देखील अनेक कारणं राहिली आहे. जसं की, माझी प्रगती होत होती आणि समोरच्या व्यक्तीच्या करियरमध्ये फार काही चांगल्या गोष्टी सुरु नव्हत्या… गोष्टी रटाळ होत होत्या. मी कायम समोरच्या व्यक्तीचा विचार करते.’
‘जर समोरच्या व्यक्तीकडून मला प्रेम मिळत नसेल तर, ती व्यक्ती देखील माझ्या प्रेमास पात्र नाही… त्यामुळे मी स्वतः म्हणते आता विभक्त झालेलं बरं आहे… नात्यात जोडीदाराला अनेक संधी देऊन देखील गोष्टी मार्गी लागत नसतील तर, त्या नात्यातून बाहेर आलेलं केव्हाही चांगलं…’ असं देखील मुनमून म्हणाली. सांगायचं झालं तर, पैसा, प्रसिद्धी सर्व काही असताना मुनमून एकटीच आयुष्य जगत आहे. मुनमुन दत्ता अभिनेता अरमान कोहलीसोबत रिलेशनशिपमध्ये होती.
मुनमुन दत्ता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.