Uddhav Thackeray | आमचे 54 नगरसेवक फोडले तरीही 65 नगरसेवक जिंकले, हीच शिवसेनेची खरी ताकद
महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागलं होतं. मुंबईमध्ये देखील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता आलं नाही, त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी या निकालावर पहिली पत्रकार परिषद घेत, प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागलं होतं. मुंबईमध्ये देखील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता आलं नाही, त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी या निकालावर पहिली पत्रकार परिषद घेत, प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘जिथे जिथे भाजपचे नगरसेवक निवडून आलेत तिथे त्यांच्या विरोधातल्या सगळ्यांची मतं एकत्र केली तर ती खूप जास्त होते’ परंतु गेल्यावेळीच्या निवडणूकीतले आकडे सांगत ठाकरे म्हणाले, ‘आमचे 84 निवडून आले तर भाजपचे 82 निवडून आले होते विरोधकांनी शहासेना करून आमचे गद्दार फोडले आणि त्याचे 82 चे 89 झाले’ मात्र आमचे अर्धे अधिक 54 फोडले तरी आमचे 65 निवडून आले ही खरी शिवसेनेची ताकद आहे.
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण...
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती

