AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Marathon: मॅरेथॉनमध्ये मुंबईकरांचा उत्साह; आमिर खानने सहकुटुंब घेतला भाग

Mumbai Marathon: टाटा मुंबई मॅरेथॉन 2026 ला सुरुवात झाली असून विधानसभा अध्यक्ष राहुल. नार्वेकर यांनी हिरवा झेंडा दाखवून या मॅरेथॉनला सुरुवात केली. या मॅरेथॉनसाठी जवळपास 70 हजारांहून अधिक धावपटूंनी नोंदणी केली.

Mumbai Marathon: मॅरेथॉनमध्ये मुंबईकरांचा उत्साह; आमिर खानने सहकुटुंब घेतला भाग
Aamir Khan and Ira KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 18, 2026 | 9:38 AM
Share

आज (रविवार, 18 जानेवारी) मुंबई मॅरेथॉनमध्ये 65 हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला आहे. या गोल्ड लेबल इंटरनॅशनल शर्यतीची एकूण बक्षीस रक्कम जवळपास 3.54 कोटी रुपये आहे. 42 आणि 21 किलोमीटरच्या या शर्यतीत सहभागी होणाऱ्या धावपटूंना कोस्टल रोडवर धावण्याची संधी मिळाली आहे. मुंबई मॅरेथॉनच्या मार्गात पहिल्यांदाच कोस्टल रोडचा समावेश करण्यात आला आहे. सर्वसामान्यांसह या मॅरेथॉनमध्ये काही सेलिब्रिटींनीही भाग घेतला आहे. सकाळी 5 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत या मॅरेथॉनला सुरुवात झाली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून या ड्रीम रनला फ्लॅग दाखवण्यात आला. मुंबई मॅरेथॉनच्या ड्रीम रनमध्ये अभिनेता आमिर खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह सहभागी झाला.

“आज मी सहकुटुंब मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो आहे आणि मला खूप चांगलं वाटत आहे. सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि व्यायाम करावा,” असं आवाहन त्याने चाहत्यांना केलं. यावेळी पाणी फाऊंडेशनचं काम चांगल्या पद्धतीने सुरु असल्याचंही त्याने सांगितलं. मुंबई महानगरपालिकेच्या निकालाविषयी प्रश्न विचारला असला निकाल काय लागला हे मी पाहिलं नाही, ते तुम्हाला माहीत आहे, असं तो पत्रकारांना म्हणाला.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीसुद्धा या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आहे. ओमर अब्दुला यांनी माहीम इथून यात सहभाग घेतला. याविषयी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “मी बऱ्याच काळापासून मुंबई मॅरेथॉनबद्दल ऐकत आहे. मी मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेत आहे. तरुणांनी आरोग्याला प्राधान्य द्यावं आणि स्मार्टफोनवर जास्त वेळ घालवणं टाळावं. आपण दररोज खेळ आणि व्यायामात भाग घेतला पाहिजे. आमच्यासारखे लोक मुंबईत येतात तेव्हा इथे आधीपेक्षा खूप फरक पाहतात. मी मुंबईत होतो. मी इथे तीन वर्षे राहिलो. त्यावेळी कोस्टल रोडसारखी पायाभूत सुविधा बांधली जाईल अशी आम्हाला कल्पनाही नव्हती. पण ती बांधली गेली आणि जर मुंबईसाठी अशा आणखी गोष्टी बांधल्या गेल्या तर त्याचा फायदा रहिवाशांना होईल.”

महापालिकेच्या निकालांविषयी ते पुढे म्हणाले, “निवडणुका बऱ्याच काळानंतर झाल्या आहेत आणि प्रत्येक निवडणुकीत कोणीतरी जिंकतो आणि कोणीतरी हरतो. ज्यांनी यश मिळवलं आहे आणि जास्तीत जास्त जागा मिळवल्या आहेत ते भाजपचे आहेत. मुंबई शहरातील रहिवाशांच्या आशा पूर्ण करणं ही त्यांची जबाबदारी आहे.”

पहिली मॅरेथॉन

हौशी मॅरेथॉन (42.995 किमी) 05.00 वाजता सीएसएमटी इथून सुरू

दुसरी मॅरेथॉन

10 किमी 06.00 वाजता सीएसएमटी येथून सुरू

तीसरी मॅरेथॉन

एलिट मॅरेथॉन (42.995 किमी) 07.00 वाजता सीएसएमटी इथून सुरू

चौथी मॅरेथॉन

दिव्यांग मॅरेथॉन १.६ किमी ०७:०५ वा. सीएसएमटी येथून सुरू झाली.

पाचवी मॅरेथॉन

जेष्ठ नागरिक मॅरेथॉन ४.२ किमी ०७:२५ वा. सीएसएमटी येथून सुरू झाली.

सहावी मॅरेथॉन

ड्रीम रन ५.९ किमी ०८:१५ वा.सीएसएमटी येथून सुरू होईल .

भाजप नेते माजी मंत्री राज पुरोहित यांचं निधन
भाजप नेते माजी मंत्री राज पुरोहित यांचं निधन.
रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करू शकतात? उद्धव ठाकरेंचा महायुतीला सवाल
रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करू शकतात? उद्धव ठाकरेंचा महायुतीला सवाल.
आमचे 54 नगरसेवक फोडले तरीही 65 नगरसेवक जिंकले, हीच शिवसेनेची खरी ताकद
आमचे 54 नगरसेवक फोडले तरीही 65 नगरसेवक जिंकले, हीच शिवसेनेची खरी ताकद.
शिंदेनी हॉटेलमध्ये नगसेवक का ठेवले? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
शिंदेनी हॉटेलमध्ये नगसेवक का ठेवले? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
“तुम्ही सत्तेत बसा, आम्ही बघतोच”किशोरी पेडणेकरांचा महायुतीला थेट इशारा
“तुम्ही सत्तेत बसा, आम्ही बघतोच”किशोरी पेडणेकरांचा महायुतीला थेट इशारा.
निकालाच्या दुसऱ्याच दिवशी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर
निकालाच्या दुसऱ्याच दिवशी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर.
बीएमसी निवडणुकीच्या स्ट्राईक रेटमध्येही भाजपची बाजी
बीएमसी निवडणुकीच्या स्ट्राईक रेटमध्येही भाजपची बाजी.
मुंबईचा महापौर हा... भाजपचे मंत्री नितेश राणेंनी दिले मोठे संकेत
मुंबईचा महापौर हा... भाजपचे मंत्री नितेश राणेंनी दिले मोठे संकेत.
अमरावतीत भाजप कुबड्या... काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल
अमरावतीत भाजप कुबड्या... काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल.
'संजय राऊत यांच्या भोंग्यामुळेच ठाकरेंची अवगती होतेय'
'संजय राऊत यांच्या भोंग्यामुळेच ठाकरेंची अवगती होतेय'.