Video | या व्यक्तीने चक्क तेजस्वी प्रकाश हिला म्हटले ‘आंटी’, चाहत्यांचा चढला पारा, थेट म्हणाले, आता हिच योग्य वेळ…

तेजस्वी प्रकाश हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. तेजस्वी प्रकाश ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. काही दिवसांपूर्वीच हे लोणावळ्याला गेले होते.

Video | या व्यक्तीने चक्क तेजस्वी प्रकाश हिला म्हटले आंटी, चाहत्यांचा चढला पारा, थेट म्हणाले, आता हिच योग्य वेळ...
| Updated on: Aug 09, 2023 | 3:21 PM

मुंबई : तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा (Karan Kundrra) हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. तेजस्वी प्रकाश हिला बिग बाॅस 15 मध्ये असतानाच नागिन मालिकेची आॅफर मिळाली होती. आता काही दिवसांपूर्वीच नागिन मालिका बंद झालीये. मात्र, या मालिकेने धमाका केला आणि ही मालिका टीआरपीमध्ये टाॅपला राहिली. तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण कुंद्रा यांची पहिली भेट ही बिग बाॅसच्या घरातच झाली आणि हे एकमेकांच्या प्रेमात पडले. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचे चाहते सतत आता यांच्या लग्नाची वाट आतुरतेने पाहताना दिसत आहेत. तेजस्वी प्रकाश हिचा वाढदिवस अत्यंत खास पध्दतीने साजरा करताना करण कुंद्रा हा दिसला होता. इतकेच नाही तर नुकताच काही दिवसांपूर्वीच तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे लोणावळ्यामध्ये धमाल करताना दिसले.

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्या जोडीला प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळताना दिसत आहे. नुकताच आता तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तेजस्वी प्रकाश हिच्या चाहत्यांना अत्यंत मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये करण कुंद्रा हा चक्क तेजस्वी प्रकाश हिला आंटी म्हणताना दिसत आहे. या व्हिडीओनंतर तेजस्वी प्रकाश हिच्या चाहत्यांचा पारा चांगलाच चढल्याचे दिसत आहे. अनेकांनी करण कुंद्रा याला खडेबोल सुनावले आहेत. आता हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, आता हे खरोखरच आती होत आहे. दुसऱ्याने लिहिले की, तेजस्वी तू आता करण विरोधात बोलायला हवे. तिसऱ्याने लिहिले की, एखाद्या मुलीला असे बोलण्याचा अधिकार कोणालाही अजिबातच नाहीये. अजून एकाने लिहिले की, मला खरोखरच या करणचा प्रचंड राग येतो यार…

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर तेजस्वी प्रकाश हिच्या चाहत्यांच्या निशाण्यानर करण कुंद्रा हा आला आहे. अनेकांनी तर थेट या व्हिडीओनंतर करण कुंद्रा याच्यासोबत ब्रेकअप करण्याचा सल्ला तेजस्वी प्रकाश हिला दिला आहे. तेजस्वी प्रकाश ही करण कुंद्रा याच्याप्रेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे. या व्हिडीओवर तेजस्वी प्रकाश हिचे चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत करताना दिसत आहेत.