Bigg Boss 16 | शिव ठाकरे याच्यासमोर अब्दू रोजिक याने दिली प्रेमाची कबुली

इतकेच नव्हे तर आता किचनमध्ये सुंबुल आणि अर्चना यांच्यामध्ये जोरदार भांडणे देखील होणार आहेत.

Bigg Boss 16 | शिव ठाकरे याच्यासमोर अब्दू रोजिक याने दिली प्रेमाची कबुली
| Updated on: Dec 13, 2022 | 9:10 PM

मुंबई : बिग बाॅसच्या घरात रोज लव्ह अॅगल पुढे येत आहेत. टीना दत्ता-शालिन भनोट, प्रियंका चाैधरी-अंकित गुप्ता, साैंदर्या शर्मा-गाैतम वीज यांच्या लव्ह स्टोरी प्रेक्षकांनी बघितल्या आहेत. आता बिग बाॅसच्या घराची सर्व सुत्रे ही टीना दत्ता, सुंबुल ताैकीर आणि साैंदर्या शर्मा यांच्या हातामध्ये आहेत. घरात रोज हंगामा होताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर आता किचनमध्ये सुंबुल आणि अर्चना यांच्यामध्ये जोरदार भांडणे देखील होणार आहेत. टीना आणि शालिन यांच्या नात्यामध्ये सर्वकाही आता ठिक नाहीये.

बिग बाॅसच्या घरातील सर्वांचा आवडता स्पर्धेक अब्दू याला घरातील एका सदस्यावर प्रेम झाले आहे. इतकेच नाहीतर बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्यावर आपण त्या व्यक्तीला प्रपोज करणार असल्याचे देखील अब्दूने सांगितले आहे.

विशेष म्हणजे अब्दूला दुसऱ्या तिसऱ्या कोणावर नाहीतर चक्क निम्रत काैरवर प्रेम झाले आहे. शिव ठाकरे याला बोलताना अब्दू म्हणाला की, मी घरात असताना प्रपोज वगैरे करणार नाहीये. बाहेर गेल्यावर मी नक्कीच तिला हे सांगेल.

यावेळी शिव ठाकरे हा अब्दू याला समजवण्याचा प्रयत्न करतो की, बाहेर निम्रतचे रिलेशन आहे. हे ऐकून अब्दू म्हणतो की, साॅरी साॅरी मला खरच हे सर्व माहिती नव्हते. तसेच यावेळी अब्दू माफी देखील मागतो.

निम्रतच्या वाढदिवसाच्या दिवशी अब्दू याने तिला हटके स्टाईलने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. बिग बाॅसच्या घरात दररोज मोठे हंगामे होताना दिसत आहेत.

साजिद खान, शिव ठाकरे, शालिन भनोट आणि टीना दत्ता हे या आठवड्यामध्ये नाॅमिनेट झाले आहेत. यामधून एकजण बिग बाॅसच्या घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. मात्र, गेल्या तीन आठवड्यांपासून घरातील सदस्यांना बेघर केले जात नाहीये.