धो-धो पाऊस- रस्त्यावर पाणी, घरी जायला रात्री…; निशीने सांगितला मुंबईतील पावसाचा अनुभव

Actress Dakshata Joil Shared Mumbai Rain Experience : 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेतील निशी अर्थात अभिनेत्री दक्षता जोईल... दक्षताला आलेला पावसाचा अनुभव तिने शेअर केलाय. मुंबईतील पावसाने ठिकठिकाणी पाणी साचलेलं असताना ती घरी कशी गेली? याबाबत ती बोलती झालीय.

धो-धो पाऊस- रस्त्यावर पाणी, घरी जायला रात्री...; निशीने सांगितला मुंबईतील पावसाचा अनुभव
दक्षता जोईल, अभिनेत्री
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 31, 2024 | 6:41 PM

पाऊस हा प्रत्येक व्यक्तीसाठी एक वेगळा अनुभव देतो, कोणासाठी तो गोड आठवणींचा साठा देऊन जातो. तर कोणाला तो काही भयानक अनुभव देतो. अशाच काहीश्या पावसाळ्यातल्या आठवणी ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतील निशी अर्थात अभिनेत्री दक्षता जोईलने सांगितल्या आहेत. मुंबईतील पावसामुळे अडकून पडल्याचा अनुभव दक्षताने शेअर केलाय. पावसात मला टपरीवरच्या काचेच्या ग्लासातला कटिंग चहा आणि गरमागरम बटाटा भजी- हिरवी चटनी खायला खूप आवडतं. ‘सारं काही तिच्यासाठी’ चा सेट ज्या ठिकाणी आहे. तिथे ही पावसाळ्यात सर्वत्र हिरवंगार होऊन जातं. भले शुटिंगमुळे तितका वेळ नाही. मिळत पण छान फोटो काढून मी ती मोमेन्ट एन्जॉय करते, असं दक्षताने सांगितलं.

मुंबईतील पावसाचा अनुभव

मुंबईच्या पावसातला एक भयानक किस्सा सांगायचं झाला तर मी 11 वीत होते. तेव्हा घरी जात असताना अचानक खूप पाऊस वाढला. मी पार्ल्यातून प्रवास करत होते. मी लोकांच्या पाऊलावर पाऊल ठेवून तो रस्ता पार करायची कसरत सुरु केली. माझं कॉलेज सुरु होऊन एक आठवडाच झाला होता. मला कळत नव्हतं की काय करू कसा तो तुंबलेले रस्ता पार करू. पाण्याचा प्रवाह लाटांसारखा येत होता. मी एका ताईसोबत थांबले. कारण नाले उघडे होते आणि मला खूप भीती वाटत होती. त्याच दिवशी एका कामानिमित्त बाबा तिथे आले होते. मी कशीतरी माझ्या बाबांपर्यंत पोहोचले. त्यादिवशी बाबा आणि मला घरी जायला 2 वाजले. हा अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही, असं दक्षता जोईल हिने सांगितलं.

दक्षताला कोणता ऋतू आवडतो?

पावसाळा मला प्रचंड आवडतो असं नाही, मला हिवाळा आवडतो. पावसाळा का नाही. आवडत याचं मुख्य कारण मुंबईचा पाऊस, म्हणजे एकतर चिखल त्यात कामानिमित्त कुठे बाहेर जायचं असेल तर रस्ते तुंबलेले असतात. वाहतूक विस्कळीत झालेली असते. त्यामुळे पावसाळ्यापेक्षा हिवाळा मला आवडतो, असं दक्षताने सांगितलं.

पण मला कोकणातला पाऊस फार आवडतो माझं गाव आहे तिथे, पाऊसात मस्त लाल मातीचे रस्ते, तो मातीचा सुगंध, हिरवीगार झाडं. खळ्यात छान बसलोय आणि समोर पाऊस पडतोय. हा नुसता संवादच मला आनंद देऊन जातो. कोकणातला पाऊस मला आवडतो आणि तो मला खुणावत राहतो, असं दक्षता म्हणाली.