बिग बॉस 16 मध्ये परत एकदा शिव ठाकरे आणि अर्चना गाैतम यांच्यामध्ये घमासान

बिग बाॅसच्या घराचा कॅप्टन कोणीही झाले तरीही अर्चना काम करत नाही. अर्चनाच्या नेहमीच्याच या नाटकाला घरातील सर्वच सदस्य कंटाळले आहेत.

बिग बॉस 16 मध्ये परत एकदा शिव ठाकरे आणि अर्चना गाैतम यांच्यामध्ये घमासान
| Updated on: Nov 16, 2022 | 7:54 PM

मुंबई : बिग बॉस 16 च्या घराचा नवीन कॅप्टन साजिद खान झाला आहे. साजिद खानच्या कॅप्टनसीमध्ये अर्चना गाैतमने काम करण्यास नकार दिल्याने घरात मोठा हंगामा होताना दिसत आहे. बिग बाॅसच्या घराचा कॅप्टन कोणीही झाले तरीही अर्चना काम करत नाही. अर्चनाच्या नेहमीच्याच या नाटकाला घरातील सर्वच सदस्य कंटाळले आहेत. साजिद खान अर्चनाला काम करण्यास सांगतो. मात्र, अर्चना काम करणार नसल्याचे साजिदला सांगते. प्रियंका आणि शिव ठाकरे दोघे मिळून अर्चनावर टीका करताना दिसतात.

नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, कॅप्टन साजिद खानसोबत अर्चना वाद घालते. अर्चनाने किचनचे काम करायचे नाही, असे साजिद खान सांगतो. कारण अर्चना कॅप्टनने सांगितलेले काम ऐकत नाही.

साजिद खानच्या कॅप्टनसीमध्ये अर्चना काम करण्यास नकार देते. यामुळे घरातील जवळपास सर्वच सदस्य अर्चनावर संताप व्यक्त करत. साजिद खानला म्हणतात की, हिला कॅप्टन कोणीही असो फक्त काम करायचे नसते.

बिग बाॅसच्या घरात प्रियंका आणि अर्चना खूप चांगला मैत्रिणी झाल्या होत्या. मात्र, दोन दिवसांपासून दोघींमध्ये खटके उडताना दिसत आहेत. अर्चना भांडणामध्ये प्रियंकाच्या कुटुंबियांपर्यंत जाते, यावेळी अंकित देखील अर्चनाला भांडताना दिसतो.

अर्चनाने घरातील काम करण्यास नकार दिल्याने शिव ठाकरेचा देखील पारा चढतो. यावेळी अर्चनाच्या कामचुकार पणावर संताप व्यक्त करत शिव अर्चनाला अनेक गोष्टी सुनावतो. परत एकदा बिग बाॅसच्या घरात प्रेक्षकांना शिव आणि अर्चनाची भांडणे बघायला मिळणार आहेत.

यापूर्वी बिग बाॅसच्या घरात अर्चना आणि शिवमध्ये मोठा हंगामा झाला होता. शिव ठाकरेचा गळा अर्चनाने पकडल्यामुळे तिला बिग बाॅसने घराच्या बाहेर काढले होते. मात्र, परत एकदा अर्चनाला घरात आणण्यात आले आहे.