Bigg Boss 16 | स्वत: ची कमजोरी सांगत बिग बाॅसच्या घरातील सदस्य ढसाढसा रडले

बाहेर मित्र आणि घरात आल्यावर त्यांच्यामध्ये सातत्याने भांडणे होत आहेत.

Bigg Boss 16 | स्वत: ची कमजोरी सांगत बिग बाॅसच्या घरातील सदस्य ढसाढसा रडले
| Updated on: Dec 04, 2022 | 11:00 PM

मुंबई : बिग बाॅसच्या घरात नेहमी हंगामा करणारे स्पर्धेक भावूक झाल्याचे दिसत आहे. बिग बाॅसचे घर असे आहे की, इथे कधी कोण कोणाचा मित्र होईल आणि दुश्मन हे सांगणे थोडे कठिणच आहे. प्रियंका आणि अंकित बिग बाॅसच्या घरात सोबत सहभागी झाले आहेत. हे दोघेही फार पूर्वीपासूनचे मित्र आहेत. मात्र, बिग बाॅसच्या घरात आल्यापासून दोघांमध्ये सातत्याने खटके उडताना दिसत आहेत. बाहेर मित्र आणि घरात आल्यावर त्यांच्यामध्ये सातत्याने भांडणे होत आहेत. सर्वांना असे वाटते की, प्रियंका ही अंकितला काहीच बोलू देत नाही.

नुकताच एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, बिग बाॅस घरातील सदस्यांना म्हणतात की, तुमच्या सर्वांना बिग बाॅसच्या घरात दाखल होऊन तब्बल आता 9 आठवडे झाले आहेत.

अनेकांच्या मनात अनेक गोष्टी आहेत. आपल्या जवळच्या व्यक्तींपासून तुम्ही सर्वचजण दूर आहात. यामुळे तुम्हाला तुमच्या मनातील गोष्टी इतरांसोबत शेअर करायच्या आहेत. चला तर मग मी तुम्हाला एक संधी देतो.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शिव ठाकरे, प्रियंका आणि अर्चना बिग बाॅससोबत बोलत आपल्या मनातील काही गोष्टी रडत रडत बोलतात. यावेळी शिव ठाकरे म्हणतो की, यांना सर्वांना वाटते की, मी सर्वकाही गेमसाठी करतोय.

परंतू मी असे अजिबात काही करत नाहीये. माझ्या मनात काय सुरू आहे, हे मी इथल्या लोकांना सांगू शकत नाही. मी त्यांच्यासमोर रडूही शकत नाही. यावेळी प्रियंका देखील बिग बाॅसला म्हणते की, मी एक साधारण मुलगी आहे.

मला लग्न करायचे आहे, माझे घर बसवायचे आहे. अंकितसोबत माझा जो मुद्दा घरात सुरू आहे तो वेगळा आहे. अर्चना देखील बिग बाॅसला अनेक गोष्टी सांगताना दिसत आहे, हे सांगताना अर्चनाला देखील अश्रू रोखता आले नाहीत.