Bigg Boss 16 | हा निर्णय सुंबुल ताैकीर हिने घेतल्याने अर्चना गाैतमचा झाला तिळपापड

बिग बाॅस फक्त राशनसाठी वेगवेगळे टास्क घरातील सदस्यांना देताना दिसत आहेत.

Bigg Boss 16 | हा निर्णय सुंबुल ताैकीर हिने घेतल्याने अर्चना गाैतमचा झाला तिळपापड
| Updated on: Dec 01, 2022 | 11:00 PM

मुंबई : बिग बाॅसच्या 16 व्या सीजनमध्ये मोठा धमाका प्रेक्षकांना बघायला मिळतोय. टास्क न देताच घरातील सदस्य जोरदार भांडणे करत आहेत. यंदाच्या सीजनमध्ये म्हणावे तेवढे जास्त टास्क अजून बिग बाॅसने घरातील सदस्यांना दिले नाहीयेत. कारण टास्कशिवायही घरामध्ये मोठे हंगामे होताना दिसत आहे. बिग बाॅस फक्त राशनसाठी वेगवेगळे टास्क घरातील सदस्यांना देताना दिसत आहेत. अर्चना गाैतमच्या निशाण्यावर सध्या सुंबुल ताैकीर असून सुंबुलसोबत जोरदार भांडणे करताना अर्चना करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर नुकताच एक प्रोमो व्हायरल झालाय. यामध्ये अर्चना गाैतम ही सुंबुल ताैकीरसोबत भांडणे करताना दिसत आहे. मात्र, दरवेळी भांडणे टाळणारी सुंबुल देखील अर्चनाला जोरदार प्रतिउत्तर देताना दिसत आहे.

इतकेच नाही तर बिग बाॅसच्या घरात एका टास्क दरम्यान निम्रत काैर आणि शालिन भनोट यांच्यामध्येही जोरदार भांडणे होतात. शालिन निम्रतबद्दल असे काही बोलतो की, ते ऐकून निम्रतचा पारा चढतो आणि त्यानंतर ती रडायला लागते.

सुंबुल बिग बॉसला सांगते की तिला कोड नाही पाहिजे. तिला कॅप्टनशीच्या स्पर्धेमध्ये कायम राहायचे आहे. हे ऐकून अर्चना गाैतमचा पारा चांगलाच चढतो आणि ती सुंबुलला अनेक गोष्टी सुनावते.

नेहमी शांत असणारी सुंबुल देखील मग अर्चनाचा चांगलाच समाचार घेत म्हणते की, तुझ्या खिशातील हे पैसे नाहीत किंवा तुझ्या खिशातून हे पैसे जात नाहीत… यानंतर सुंबुल आणि अर्चनामधील वाद वाढतानाच दिसतो.

अर्चना गाैतम घरातील प्रत्येक सदस्यासोबत भांडणे करते. इतकेच नाही तर अर्चनाने चक्क शिव ठाकरे याचा गळा पकडला होता. त्यानंतर तिला बिग बाॅसच्या घराबाहेर देखील काढण्यात आले होते. मात्र, सलमान खान याने परत तिला बिग बाॅसच्या घरात घेतले.