Raju Srivastava | राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत मोठे अपडेट, डाॅक्टरांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय…

राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात होत्या. यादरम्यान राजू यांची मुलगी अंतरा हीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत महत्वाची माहिती दिली.

Raju Srivastava | राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत मोठे अपडेट, डाॅक्टरांनी घेतला हा मोठा निर्णय...
| Updated on: Sep 20, 2022 | 8:34 AM

मुंबई : राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या तब्येतीबाबत एक अत्यंत मोठे अपडेट पुढे येतंय. गेल्या काही दिवसांपासून राजू यांना सातत्याने ताप येत असल्याचे सांगितले जातंय. एम्स रूग्णालयातील डाॅक्टरांची टीम राजू यांच्या तब्येतीत सुधारणा आणण्यासाठी मेहनत घेत आहे. मात्र, राजू यांना ताप (Fever) येत आहे. यामुळे सर्वांचेच टेन्शन वाढले असून यावर आता डाॅक्टरांनी महत्वाचा निर्णय घेतलांय. राजू यांची तब्येत बरी व्हावी याकरिता देशभरातून चाहते प्रार्थना करत आहेत. राजू यांची मुलगी अंतराने पप्पांची तब्येत स्थिर असल्याचे दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (Social media) पोस्ट शेअर करून सांगितले होते.

राजू श्रीवास्तव यांच्या हेल्थसाठी डाॅक्टरांनी घेतला अत्यंत मोठा निर्णय

राजू श्रीवास्तव यांना ताप येत असल्याने आता डाॅक्टरांनी एक मोठा निर्णय घेतलांय. काही दिवसांपूर्वी डाॅक्टरांनी राजू यांची पत्नी आणि मुलगी अंतरा यांना राजू श्रीवास्तव यांना भेटण्याची परवानगी दिली होती. मात्र, सतत होणारा संसर्ग पाहता आता एम्सच्या डाॅक्टरांनी पत्नी आणि मुलगी अंतरा यांना आयसीयूमध्ये जाऊन राजू यांना भेटण्यास मनाई केलीये. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव यांचा व्हेंटिलेटरचा पाईप बदलला होता.

जाणून घ्या आता कशी आहे राजू श्रीवास्तव यांची तब्येत

राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात होत्या. यादरम्यान राजू यांची मुलगी अंतरा हीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत महत्वाची माहिती दिली होती. अंतराने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, राजू श्रीवास्तव यांची तब्येत सध्या स्थिर आहे, हळूहळू त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे. तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. राजू श्रीवास्तव लवकरच बरे होतील.