TMKOC | अखेरच्या दिवसांत ‘नट्टू काका’ विसरले होते स्वतःच नाव, वडिलांच्या आठवणी सांगताना मुलगा भावूक!

| Updated on: Oct 13, 2021 | 8:49 AM

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘नट्टू काकां’ची भूमिका साकारणारे घनश्याम नायक यांनी काहीच दिवसांपूर्वीच या जगाचा निरोप घेतला. ते कर्करोगाने ग्रस्त होते. घनश्याम नायक यांच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रातील अनेक लोकांनी शोक व्यक्त केला.

TMKOC | अखेरच्या दिवसांत ‘नट्टू काका’ विसरले होते स्वतःच नाव, वडिलांच्या आठवणी सांगताना मुलगा भावूक!
Ghanshyam Nayak
Follow us on

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘नट्टू काकां’ची भूमिका साकारणारे घनश्याम नायक यांनी काहीच दिवसांपूर्वीच या जगाचा निरोप घेतला. ते कर्करोगाने ग्रस्त होते. घनश्याम नायक यांच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रातील अनेक लोकांनी शोक व्यक्त केला. नट्टू काकांच्या मुलाने आता आपल्या वडिलांचे शेवटचे दिवस कसे गेले ते सांगितले आहे.

घनश्याम नायक यांचा मुलगा विकास याने काही दिवसांपूर्वी ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत वडिलांच्या शेवटच्या काही आठवणींबद्दल सांगितले आहे. ते म्हणाले की, शेवटच्या दिवसात पप्पांना श्वास घेणे कठीण होत होते आणि आम्ही त्यांच्यासाठी घरी ऑक्सिजन आणि नर्सची व्यवस्था करत होतो. पण अचानक त्याची तब्येत बिघडली आणि आम्ही त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेले. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. काही वेळानंतर त्यांना सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले. तेव्हा ते थोडे बरे झाले होते, परंतु नंतर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना पुन्हा आयसीयूमध्ये हलवण्यात आले.

कोणाला ओळखणे देखील कमी झाले!

विकासने पुढे सांगितले की, त्याच्या मृत्यूच्या 15 दिवस आधी त्यांची साखरेची पातळी अचानक वाढली होती आणि ते कोणालाही ओळखू शकत नव्हते. पण, जेव्हा त्यांची साखरेची पातळी खाली आली, तेव्हा त्यांना माहित होते की त्याच्या आजूबाजूला कोण आहे.

त्याने पुढे सांगितले की, 2 ऑक्टोबर रोजी वडिलांनी मला विचारले की, मी कोण आहे. ते आपले नाव सुद्धा विसरले होते. त्या वेळी मला जाणवले की, त्यांचा दुसऱ्या जगातील प्रवास आता सुरु झाला आहे.

अभिनेते घनश्याम नायक 3 ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला. 4 ऑक्टोबर रोजी त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले, जेथे तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेची संपूर्ण टीम पोहोचली होती. ते गेल्या 1 वर्षापासून कर्करोगाशी लढा देत होते.

घनश्याम नायक यांची केमो थेरपी चालू होते, तरीही त्यांनी वर्ष 2021 मध्ये काम केले होते. त्यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’साठी शूट केले होते, याशिवाय त्यांनी जाहिरातीमध्ये देखील काम केले होते.

त्यांना जगण्याची होती आशा

केमोथेरपी उपचारानंतरही घनश्याम नायक यांना पूर्ण विश्वास होता की ते पूर्णपणे बरे होतील आणि शूटिंगमध्ये परततील. या दरम्यान त्यांनी काही भागांचे चित्रीकरणही केले. जेव्हा त्यांनी 3 महिन्यांपूर्वी त्यांच्या तब्येतीबद्दल सांगितले, तेव्हा तारकच्या सेटवर परत येण्यास उत्सुक होते. “मी ठीक आणि निरोगी आहे. इतकी मोठी समस्या नाही. खरं तर प्रेक्षक उद्या तारक मेहता का उल्टा चष्माच्या एका भागात मला भेटतील. हा एक अतिशय खास भाग आहे आणि मला आशा आहे की, त्यांना माझे काम पुन्हा आवडेल.”

मरेपर्यंत काम करायचे होते

घनश्याम नायक म्हणाले की, ते एक कलाकार आहेत आणि त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची इच्छा आहे. त्यांच्या कामगिरीदरम्यान त्यांना मृत्यूही यावा अशी त्याची इच्छा होती. मात्र, त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. पण गुजराती आणि हिंदी मनोरंजन आणि नाट्य उद्योगातील त्यांचे योगदान प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील. कारण कलाकार मरतो, पण त्याची कला त्याच्या अस्तित्वाचा दिवा नेहमी त्याच्या मागे तेवत ठेवतो.

हेही वाचा :

Janhvi Kapoor : जान्हवी कपूरने रेट्रो लूकमध्ये केला कहर, हे सुंदर फोटो पाहाच

‘या’ प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाची नात झळकणार ‘सूर्यवंशी’ चित्रपटात, सर्वत्र आहे बोल्डनेसची चर्चा