KBC 16: केबीसीमध्ये वैष्णवीला भेटून अमिताभ आश्चर्यचकीत, जीवनात पहिल्यांदा मिळाला चेक, आता…

amitabh bachchan kbc: हॉटसीटवर पोहचलेली वैष्णवी हिच्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे जिंकलेल्या रक्कमेचा मिळालेला चेक होता. जीवनात पहिल्यांदा तिला चेक मिळाला होता. तिने ही रक्कम वडील विवेकानंद यांना समर्पित केली.

KBC 16: केबीसीमध्ये वैष्णवीला भेटून अमिताभ आश्चर्यचकीत, जीवनात पहिल्यांदा मिळाला चेक, आता...
amitabh bachchan
| Updated on: Aug 18, 2024 | 8:48 AM

‘कौन बनेगा करोडपती 16’ ची सुरुवात झाली आहे. अमिताभ बच्चन पुन्हा एकदा देशातील सर्वात मोठ्या क्विज शो मध्ये सहभागी होण्याची संधी देत आहे. वेगवेगळे प्रतिभावंत हॉटसीटवर येणार आहेत. कोणी आपल्यासाठी तर कोणी आपल्या परिवारासाठी ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये आपली बुद्धीमत्ता अन् नशीब अजमवण्यासाठी येतात. झारखंडमधील झुमरी तलैया येथील वैष्‍णवी भारती या शोमध्ये आली. तिची प्रेरणा देणारी कहाणी आहे. ती ऐकून बीग बी सुद्धा आश्चर्यचकीत झाले. वैष्‍णवीला तिच्या आयुष्यात पहिल्यांदा चेक मिळाला.

वैष्णवीला घर बनवायचं

वैष्‍णवी भारतीची इच्छा आपल्या परिवारासाठी एक चांगले घर बनवावे. आपल्या वडिलांसाठी वैद्यकीय विमा करणे आणि राहिलेल्या पैशांमधून आपले शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे. 21 वर्षाची वैष्णवी आर्थिक परिस्थितीमुळे अनेक अडचणींचा सामना करत आहे. त्यानंतर ती बिहार लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत आहे. तिने एमएची पदवी घेतली आहे. तिला आई नसल्यामुळे वडील विवेकानंदसोबत आपले घर चालवते. वर्गात तिने कधी पहिला क्रमांक सोडला नाही.

वैष्‍णवीची कहाणी ऐकून अमिताभला धक्का

अमिताभ बच्‍चनसुद्धा वैष्‍णवीची कहाणी, अभ्यासंदर्भात तिचे समर्पण आणि घरातील जबाबदाऱ्या या सर्वांचे ताळमेळ पाहून आश्चर्यचकीत झाले. वैष्णव शोमध्ये सांगते तिचे सर्वात जवळचे नाते तिच्या वडिलांशी आहे. आपल्या जीवनात वडील सर्वात मजबूत सपोर्ट सिस्टम राहिले आहेत. आमच्या भागातील सर्वच लोक विचार करतात मुली फक्त घरातील कामे करण्यासाठी असतात. परंतु वडिलांना कधी हा विचार केला नाही. उलट वडील म्हणतात, वैष्णवी घरातील लक्ष्मी आहे. ती सर्वांना एकत्र ठेवते.

आयुष्यातील पहिला चेक मिळाला अन्…

हॉटसीटवर पोहचलेली वैष्णवी हिच्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे जिंकलेल्या रक्कमेचा मिळालेला चेक होता. जीवनात पहिल्यांदा तिला चेक मिळाला होता. तिने ही रक्कम वडील विवेकानंद यांना समर्पित केली. वैष्णवीच्या विचाराने प्रभावित होऊन अमिताभ बच्चन यांनी वडिलांना चेक देण्याचे सांगितले. त्यावेळी वडील आनंदीत होऊन म्हणाले, माझ्या मुलीचा हा पहिला पगार आहे. ईश्वराने आम्हाला वैष्णवीसारखी मुलगी दिली. त्यामुळे ईश्वराचे मी खूप आभार मानतो.