AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khatron Ke Khiladi 11 : दिव्यांका त्रिपाठीला मागे टाकत अर्जुन बिजलानीने जिंकली KKK11ची ट्रॉफी

शोला त्याचा विजेता मिळाला आहे. टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीने शोच्या अंतिम फेरीत दिव्यांका त्रिपाठीला पराभूत करून खतरों के खिलाडीचे विजेतेपद पटकावलं आहे. (Khatron Ke Khiladi 11: Arjun Bijlani wins KKK11 trophy beating Divyanka Tripathi)

Khatron Ke Khiladi 11 : दिव्यांका त्रिपाठीला मागे टाकत अर्जुन बिजलानीने जिंकली KKK11ची ट्रॉफी
| Edited By: | Updated on: Sep 22, 2021 | 5:16 PM
Share

मुंबई : खतरों के खिलाडी 11 ( Khatron Ke Khiladi 11) च्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. या शोला त्याचा विजेता मिळाला आहे. टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीने (Arjun Bijlani) शोच्या अंतिम फेरीत दिव्यांका त्रिपाठीला (Divyanka Tripathi ) पराभूत करून खतरों के खिलाडीचे विजेतेपद पटकावलं आहे. याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नसली, तरी विजेत्याचे नाव समोर आलं आहे. शेवटचा भाग येत्या वीकेंडला प्रसारित होईल.

या प्रसिद्ध रिअॅलिटी शोचा शेवट मंगळवारी मुंबईत शूट करण्यात आला होता, त्या दरम्यान दिव्यांका त्रिपाठी, विशाल आदित्य सिंग, श्वेता तिवारी, निक्की तांबोळी सारखे सर्व स्पर्धक पोहोचले होते. विशाल आदित्य सिंग तिसऱ्या क्रमांकावर बाद झाला, त्यानंतर दिव्यांका आणि अर्जुन यांच्यात लढत झाली.

आतापर्यंत विजेत्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण सोशल मीडियावरून असे संकेत मिळत आहेत की अर्जुन बिजलानी शोचा विजेता आहे. सुप्रसिद्ध टीव्ही पत्रकार सलील अरुण कुमार यांनी ट्विट करून चाहत्यांना सांगितलं की, अर्जुन बिजलानी शोचा विजेता बनला आहे. अर्जुन बिजलानीनं शोचा प्रत्येक धोकादायक स्टंट पूर्ण उत्साहाने केला आणि प्रत्येक अडथळा जिंकून खतरों के खिलाडीचा विजेता होण्याची ट्रॉफी जिंकली.

त्याने मनापासून प्रत्येक स्टंट पूर्ण केला आणि शोचे होस्ट रोहित शेट्टीला प्रभावित केलं. टॉप 3 दिव्यांका त्रिपाठी आणि विशाल आदित्य सिंह अर्जुन बिजलानीसह पोहोचले होते. त्यानंतर विशाल पहिल्यांदा टास्कमध्ये आणि नंतर अंतिम सामन्यात अर्जुननं दिव्यांकाचा पराभव केला.

पाहा पोस्ट (See Post)

पत्रकार सलील अरुण कुमार यांनी दिव्यांकाबद्दल ट्विट केले की, “खतरों के खिलाडी 11 चे नाव दिव्यांका त्रिपाठीच्या नावावर ठेवलं. तिने संपूर्ण शोमध्ये राज्य केलं आणि ते साध्य केलं. बॅड लक गर्ल! तू एक रॉक स्टार आहेस.” दिव्यांका संपूर्ण शोमध्ये उत्कृष्ट कामगिरी करताना दिसली. तिने अर्जुनला फायनल टास्कमध्येही कडवी स्पर्धा दिली.

सध्या चाहते यासंदर्भात अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत.

संबंधित बातम्या

Sanak | विद्युत जमवाल लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘सनक’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार!

KBC 13 | अमिताभ बच्चनच्या ‘केबीसी 13’ला मिळणार दुसरा करोडपती, प्रांशू जिंकेल का 1 कोटींचं बक्षीस?

Rahul Vaidya Disha Parmar : ‘खतरों के खिलाडी 11’ च्या फायनल शूटनंतर राहुल वैद्य आणि दिशा परमार निघाले हनिमूनला

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.