KBC 13 | अमिताभ बच्चनच्या ‘केबीसी 13’ला मिळणार दुसरा करोडपती, प्रांशू जिंकेल का 1 कोटींचं बक्षीस?

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी होस्ट केलेल्या 'कौन बनेगा करोडपती सीझन 13' या शोचा नवा प्रोमो (KBC 13 प्रोमो) बघितल्यावर असे वाटते की, शोला लवकरच दुसरा करोडपती मिळणार आहे. हिमानी बुंदेला या शोची पहिली करोडपती बनली आहे.

KBC 13 | अमिताभ बच्चनच्या ‘केबीसी 13’ला मिळणार दुसरा करोडपती, प्रांशू जिंकेल का 1 कोटींचं बक्षीस?
KBC 13

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी होस्ट केलेल्या ‘कौन बनेगा करोडपती सीझन 13’ या शोचा नवा प्रोमो (KBC 13 प्रोमो) बघितल्यावर असे वाटते की, शोला लवकरच दुसरा करोडपती मिळणार आहे. हिमानी बुंदेला या शोची पहिली करोडपती बनली आहे. त्याचबरोबर आता स्पर्धक प्रांशु त्रिपाठी याच्याकडे या हंगामातील दुसरा करोडपती म्हणून पाहिले जात आहे.

सोनी टीव्ही, ‘केबीसी 13’ने शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन प्रांशुला 1 कोटी रुपयांचा प्रश्न विचारताना दिसतात. मात्र, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही की, प्रांशु 1 कोटी रुपये जिंकू शकतो की नाही? प्रोमो व्हिडीओमध्ये प्रांशु अमिताभ बच्चन यांच्यासोबत धमाल करताना तुम्हालाही पाहायला मिळेल.

अमिताभ बच्चनसोबत प्रांशुची धमाल

या प्रोमो व्हिडीओनुसार, अमिताभ यांच्या कोटकडे पाहून प्रांशु म्हणतो की, माझ्याकडेही असा कोट आहे. खिश्याकडे बोट दाखवत प्रांशु म्हणाला की, पण असा खिसा माझ्याकडे नाही. इथे तो कोटाच्या पॉकेट स्क्वेअरबद्दल बोलत होता. पॉकेट स्क्वेअर म्हणजे खिशात एका शैलीत ठेवलेला रुमाल. तो पॉकेट स्क्वेअरकडे पाहून म्हणतो की, हा मला खूप निरुपयोगी वाटतो. यानंतर, अमिताभ बच्चन प्रांशुला म्हणतात की, जेव्हा हा खेळ संपेल, तेव्हा आम्ही तो काढून टाकू आणि तुम्हाला देऊ.’

मैत्रिणीऐवजी रोहित शर्माचे फोटो ठेवतो सोबत!

याआधीही एक प्रोमो शेअर करण्यात आला होता, ज्यात अमिताभ बच्चन प्रांशुवर एक विनोद करताना दिसले होते. यावेळी ते म्हणाले की, एक गर्लफ्रेंड असूनही, हा त्याच्या पाकिटात नेहमी रोहित शर्माचा फोटो घेऊन फिरतो. प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, अमिताभ बच्चन म्हणतात की, तो रोहित शर्माचा फोटो त्याच्या वॉलेटमध्ये ठेवतो, तर गर्लफ्रेंडचा फोटो का ठेवत नाही.?

पाहा प्रोमो :

यानंतर अमिताभ बच्चन प्रांशुला विचारतात की, त्याची आणि मैत्रीण अनामिका भेट कशी झाली? यावर प्रांशु म्हणतो, आम्ही दोघे कॉलेजमध्ये भेटलो. आमचा स्वभाव काहीसा सारखा आहे. यानंतर, अमिताभ बच्चन त्याला विचारतात की, जर त्याला रोहित शर्मा आणि अनामिका यापैकी कोणी निवडायचे असेल तर तो कोणाची निवड करेल. यावर प्रांशु म्हणतो – सर, हा सात कोटी रुपयांपेक्षा अधिक कठीण प्रश्न आहे. या प्रश्नासाठी तुम्ही कोणतीही लाईफलाईन दिली नाही.

हेही वाचा :

Mazhi Tuzhi Reshimgaath |  श्रेयस-प्रार्थना-मायारासोबतच ‘शेफाली’ही प्रेक्षकांच्या पसंतीस, या हटके भूमिकेबद्दल सांगताना काजल काटे म्हणते…

Happy Birthday: ‘त्या’ चुंबन प्रकरणाने वादग्रस्त ठरली, पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्येही चर्चेत; कोण आहे अभिनेत्री रिद्धि डोगरा?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI