Video: अंडरवॉटर फोटोशूट कसं केलं जातं? पहा ‘बिहाइंड द सीन्स’ व्हिडीओ!

| Updated on: Mar 12, 2022 | 7:30 AM

काही दिवसांपूर्वी 'मराठी सिनेसृष्टीतील जलपरी' (Marathi Actress) म्हणून अभिनेत्री रीना मधुकरची (Reena Madhukar) चर्चा रंगली होती. फक्त प्रेक्षकांकडूनच नव्हे तर कलाकारांकडूनसुद्धा तिचं कौतुक होत होतं. रीनाने पहिल्यांदाच अंडरवॉटर फॅशन फोटोग्राफी केली.

Video: अंडरवॉटर फोटोशूट कसं केलं जातं? पहा बिहाइंड द सीन्स व्हिडीओ!
Reena Madhukar
Image Credit source: Instagram
Follow us on

काही दिवसांपूर्वी ‘मराठी सिनेसृष्टीतील जलपरी’ (Marathi Actress) म्हणून अभिनेत्री रीना मधुकरची (Reena Madhukar) चर्चा रंगली होती. फक्त प्रेक्षकांकडूनच नव्हे तर कलाकारांकडूनसुद्धा तिचं कौतुक होत होतं. रीनाने पहिल्यांदाच अंडरवॉटर फॅशन फोटोग्राफी केली. तिच्या या फोटोशूटला सर्वांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आता त्याच अंडरवॉटर फोटोशूटचा एक BTS व्हिडीओ रीना मधुकरच्या युट्युब चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. त्या व्हिडीओमध्ये रीनाची तयारी, मेकअप, फोटो क्लिक करण्यासाठी पाण्याखाली जातानाचे, पाण्यात पोझ देतानाचे क्षण, टीम वर्क पाहायला मिळतंय. अंडरवॉटर फोटोशूट कसं केलं जातं, हे या व्हिडीओतून दिसतंय. (Underwater Photoshoot)

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी अंडरवॉटर फोटोशूट केलं आहं, पण मराठीत अंडरवॉटर फॅशन फोटोग्राफी फारशी केली गेली नाही. पाण्याखाली जाऊन फोटोसाठी पोज देणे, चेह-यावरील हावभाव अगदी अचूक दाखवणे ही खरोखर एक कला आहे आणि रीनाने तिच्या या फोटोशूटमध्ये या सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट केल्या आहेत. या प्रकारच्या फोटोशूटमध्ये कपडे, मेकअप याला पण विशेष महत्त्व असतं. रीनाची स्टायलिस्ट निकेता बांदेकर, मेकअप आर्टिस्ट निखिल पवार यांनी पण पाण्याखाली कोणत्या प्रकारचं फॅब्रिक जास्त रेखीव दिसेल, पाण्यातही ग्लो दिसेल असा मेकअप आदी गोष्टींचा विचार करुन त्यांची कलाकारी दाखवली. हे सर्वकाही जुळून आलं की खरी कसरत सुरु होते ती फोटोग्राफरची. कॅमेराचे सेट पाण्याखाली घेऊन जाणे, जसा हवा अगदी तसाच शॉट मिळवणे ही सगळी कला फोटोग्राफरची.

या कमाल फोटोशूटच्या अनुभवाबद्दल रीनाने सांगितलं, “पाण्याच्या खाली जाऊन एक्स्प्रेशन देणं, डोळे उघडे ठेवून कॅमेरा फेस करणं हे खूप आव्हानात्मक होतं. मला आणि फोटोग्राफर सुमीत, आम्हा दोघांनाही अशा प्रकारच्या फोटोशूटचा अनुभव नसल्यामुळे कसं होईल, काय होईल याची भिती होती पण काही तरी ऍडवेंचर करतोय म्हणून उत्साह जास्त होता. मुळात, थंडी इतकी होती की काय सांगू. पण माझी टीम निकेता, निखिल, सुमीत, नवीन, दिपेश, हर्षल हे सर्वजण फार सपोर्टिंग होते, त्यांनी मला संपूर्ण फोटोशूटच्या दरम्यान चिअर अप केलं. हे फोटोशूट एक टीम वर्क होतं.”

हेही वाचा:

काळ्या गाऊनवरून ट्रोल करणाऱ्यांना मलायकाने झापलं; “हेच हॉलिवूड सेलिब्रिटींनी केलं असतं तर..”

अरुंधती के मन मे फुटा लड्डू? आशुतोषनं मन मोकळं केलं, अप्पासाहेब देशमुख लग्न लावून देणार?