AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Reena Madhukar : ‘मन उडू उडू झालं’साठी उत्सुक आहे रिना मधुकर; साकारणार महत्त्वाची भूमिका

‘मन उडू उडू झालं’ ही रिनाची पहिली मराठी मालिका आहे. याविषयी व्यक्त होताना रिना म्हणते की, मन उडू उडू झालं’ ही माझी पहिली मराठी मालिका त्यामुळे मला असं वाटतंय की मी माझ्या मायेच्या, हक्काच्या घरी परत आली आहे. (Reena Madhukar is looking forward to 'Man Udu Udu Zhala'; An important role to play)

| Edited By: | Updated on: Sep 04, 2021 | 7:32 AM
Share
ग्लॅमरस अंदाज हा नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालतो. एखादी व्यक्ती नेहमी ग्लॅमरस आणि स्टायलिश लूकमध्ये दिसली की तिची छबी तयार होते पण तिच व्यक्ती जर सिंपल आणि सोबर लूकमध्ये दिसली की तितकाच निरागसपणा किंवा सिंपलिसिटी त्या व्यक्तीमध्ये दिसून येते आणि त्यामुळे प्रेक्षकांवर त्याची जास्त भुरळ पडते. असंच काहीसं आहे अभिनेत्री रिना मधुकर.

1 / 6
अभिनेत्री रिना मधुकरने आतापर्यंत तिचा सोशल मिडीया प्रेझेन्स अतिशय ग्लॅमरस ठेवला आहे जो तिच्या चाहत्यांनाही आवडतोय. पण अभिनय आणि कामाच्या बाबतीत तिने नेहमीच वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका साकारल्या आहेत.

2 / 6
जसे की ‘अजिंठा’ या मराठी सिनेमात तिने आदिवासी पात्राची भूमिका साकारली, तर ‘एजंट राघव- क्राईम ब्रांच’  हिंदी टेलिव्हिजन शोमध्ये फॉरेसिंक डॉक्टरच्या भूमिकेत दिसली. इतकेच नव्हे तर ‘तलाश’ हिंदी सिनेमात पोलिसाचं पात्रं साकारलं आणि '31 दिवस’ या मराठी सिनेमात अंध मुलीच्या भूमिकेतून ती प्रेक्षकांसमोर आली.

3 / 6
थोडक्यात काय तर, रिना मधुकरने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत नाविन्य होतं. आता रिना झी मराठीवरील मंदार देवस्थळी दिग्दर्शित ‘मन उडू उडू झालं’ मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. या मालिकेत ती ‘सानिका देशपांडे’ची भूमिका साकारत आहे जी नायिका साकारत असेल्या हृता दुर्गुळेची ऑनस्क्रीन बहिण दाखवली आहे.

4 / 6
‘मन उडू उडू झालं’ ही रिनाची पहिली मराठी मालिका आहे. याविषयी व्यक्त होताना रीना म्हणते की, "‘मन उडू उडू झालं’ ही माझी पहिली मराठी मालिका त्यामुळे मला असं वाटतंय की मी माझ्या मायेच्या, हक्काच्या घरी परत आली आहे आणि फक्त माझ्याच नव्हे तर मी जगभरातल्या सर्व मराठी प्रेक्षकांच्या घरी आली आहे ज्यांना मी आठवड्यातले सलग ६ दिवस भेटणार आहे आणि त्यांच्याच घरातला एक भाग बनणार आहे. तसेच या मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याची छान संधी या निमित्ताने मला मिळाली. हृता दुर्गुळेचं काम मी पाहिलं होतं आणि मला आवडलेलं.  हृतासोबत आणि इतर कलाकारांसोबत काम करताना मजा येतेय. झी मराठी वाहिनी ही देखील माझ्यासाठी खास संधी आहे कारण या वाहिनीशी प्रत्येक मराठी कुटुंब जोडलं गेलं आहे. तसेच सेटवरील वातावरण अगदी हलकं-फुलकं, प्रसन्न आहे असं वाटतंय जणू वर्क फ्रॉम होम च चालू आहे इतक्या छान पद्धतीने सेटवर सर्वांचा वावर असतो."

5 / 6
यापूर्वी रिनाने मराठी सिनेमांत काम केले आहे. हिंदी मनोरंजनसृष्टीमध्ये देखील रीनाने तिची स्वत:ची ओळख तयार केली आहे, त्यामुळे तिच्या या पहिल्या मराठी मालिकेला मराठी कलाकारांसह हिंदी कलाकारांनीही शुभेच्छा दिल्या. ग्लॅमरस रीनाचा ऑनस्क्रिन नवा लूक आणि नवी भूमिका प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची ट्रिट ठरणार हे नक्की.

6 / 6
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.