Rakhi Sawant’s Husband | ‘बिग बॉस 15’च्या घरात राखी सावंतच्या पतीची एन्ट्री! ‘ड्रामा क्वीन’च्या नवऱ्याला पाहिलंत का?

गेल्या सीझनमध्येही राखीचा पती रितेशच्या एन्ट्रीच्या अनेक बातम्या आल्या होत्या आणि राखीच्या पतीचा चेहरा पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते, पण रितेश काही आलाच नाही. त्यानंतरही राखीच्या लग्नावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, ती खोटे बोलत नसल्याचे अभिनेत्रीने म्हटले होते.

Rakhi Sawant’s Husband | ‘बिग बॉस 15’च्या घरात राखी सावंतच्या पतीची एन्ट्री! ‘ड्रामा क्वीन’च्या नवऱ्याला पाहिलंत का?
Bigg Boss 15 Promo

मुंबई : ‘ड्रामा क्वीन’ अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही बिग बॉसची आतापर्यंतची सर्वात मनोरंजक स्पर्धक आहे. चाहत्यांना राखीला या शोमध्ये पाहणे खूप आवडते, म्हणूनच शोचे निर्माते तिला प्रत्येक सीझनमध्ये पाहुणी म्हणून बोलावतात. मागील सीझनमध्येही राखीने सर्वांचे खूप मनोरंजन केले होते आणि आता या सीझनमध्ये राखी पुन्हा शोमध्ये परतली आहे.

मात्र, यावेळी ती एकटी नसून एका खास व्यक्तीला घेऊन आली आहे, ज्याला पाहण्यासाठी सर्वजण खूप उत्सुक होते. या शोचा एक नवा प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये राखीने कॅमेऱ्यासमोर घोषणा केली की ती पहिल्यांदाच नॅशनल टीव्हीवर तिच्या पतीची अर्थात रितेशची ओळख करून देणार आहे. यावेळी राखी म्हणते की, ‘सर्वजण म्हणायचे की राखीने लग्नच केले नाहीये, ती खोटे बोलत आहे आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे सर्व करत आहे. पण, आता मी या सर्वांसाठी उत्तर घेऊन आले आहे.’

पाहा प्रोमो :

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

या व्हिडीओमध्ये राखी ‘मेरा पिया घर आया’ या गाण्यावर डान्स करताना दिसते. यानंतर घराचा मुख्य दरवाजा उघडतो आणि एक व्यक्ती घरात येते. त्या माणसाचा चेहरा लपवलेला आहे. पण तो येताच राखी त्याची आरती करते आणि पाया देखील पडते.

पाहा कसा दिसतो राखीचा पती…

शोमध्ये येण्यापूर्वी राखीने बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, लोक तिच्यावर लग्नाबद्दल खोटं बोलत असल्याचा आरोप करतात. मात्र, आता ती बिग बॉसमध्ये पतीसोबत येऊन सर्वांची तोंडं बंद करणार आहे.

गेल्या सीझनमध्येही राखीचा पती रितेशच्या एन्ट्रीच्या अनेक बातम्या आल्या होत्या आणि राखीच्या पतीचा चेहरा पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते, पण रितेश काही आलाच नाही. त्यानंतरही राखीच्या लग्नावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, ती खोटे बोलत नसल्याचे अभिनेत्रीने म्हटले होते.

रितेशला पाहून नेटकरी काय म्हणाले?

‘बिग बॉस 15’मध्ये राखीच्या पतीला पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहे. रितेश नेमका कसा दिसतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र, सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यात रितेशचा चेहरा दिसत आहे. हे फोटो पाहून काही जण राखीला शुभेच्छा देत आहेत, तर काही जण हा पती नकली असल्याचे म्हणत आहेत. अर्थात आता खरंच तो रितेश आहे की आणखी कोणी हे ‘बिग बॉस 15’च्या येत्या भागांत कळणार आहे.

हेही वाचा :

अभिनेता मंगेश देसाईंची नवी इनिंग, निर्माता म्हणून मनोरंजन विश्वात करणार पदार्पण!

Virat kohli : विराट कोहलीचा आणि युजवेंद्र चहलच्या बायकोचा हा नाद खुळा डान्स पहा, व्हिडिओ तुफान व्हायरल


Published On - 3:56 pm, Fri, 26 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI