Video | सलमान खान कतरिना कैफ हिच्या तालावर नाचला, वाचा काय घडले

सुंबुल तिच्या वडिलांचे काही ऐकत नाही तर आपले काय ऐकणार असेही यावेळी बोलताना सलमान म्हणाला.

Video | सलमान खान कतरिना कैफ हिच्या तालावर नाचला, वाचा काय घडले
| Updated on: Oct 29, 2022 | 10:11 AM

मुंबई : डेंग्यूतून बरे होत सलमान खान पुन्हा एकदा बिग बाॅसच्या मंचावर दिसला. विकेंडच्या वारला सलमान खान याने होस्ट केले. यावेळी सुंबुल, अंकित आणि गाैतमचा जोरदार क्लास सलमान खान याने घेतला. सुंबुलवर तर सलमान खानचा पाराच चढला. सुंबुल तिच्या वडिलांचे काही ऐकत नाही तर आपले काय ऐकणार असेही यावेळी बोलताना सलमान म्हणाला. बिग बाॅसच्या मंचावर कतरिना कैफ आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहचली होती.

बिग बाॅसच्या मंचावरील सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये सलमान खान कतरिनाच्या तालावर नाचताना दिसतोय. दोघे टिप टिप बरसा पानी या गाण्यावर डान्स करत आहेत. सलमान खान आणि कतरिना यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडलीये.

सलमान खान आणि कतरिना कैफ यांनी बिग बाॅसच्या मंचावर सोबत पाहून चाहते देखील आनंदी दिसत आहेत. ही जोडी टायगर 3 या चित्रपटात एकत्र दिसणार असल्याने चाहते गेल्या अनेक वर्षांपासून या चित्रपटाची वाट पाहात आहेत. सलमान आणि कतरिनाचा डान्स सर्वांनाच जबरदस्त आवडलाय. बिग बाॅसच्या घराचा कॅप्टन होण्यासाठी आता सलमान खान घरातील सदस्यांना एक टास्क देतो, ज्यावरून घरात आता जोरदार हंगामा बघायला मिळणार आहे.