Bigg Boss 16 | शालिन भनोट आणि टीना दत्ता यांच्यामधील तो प्रकार बघून घरातील सदस्यांना मोठा धक्का

बिग बाॅसच्या घरामध्ये राहण्यासाठी टीना आणि शालिन हे दोघेही फेक रिलेशन तयार करत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

Bigg Boss 16 | शालिन भनोट आणि टीना दत्ता यांच्यामधील तो प्रकार बघून घरातील सदस्यांना मोठा धक्का
| Updated on: Jan 03, 2023 | 5:14 PM

मुंबई : बिग बाॅस 16 मध्ये मोठा हंगामा होताना दिसत आहे. एमसी स्टॅनचा एक शो घरामध्ये पार पडलाय. या शोला बिग बाॅसने काही चाहत्यांना देखील घरात बोलावले होते. मात्र, चाहत्यांना बघताच घरात भांडणारे आणि गेल्या दोन दिवसांपासून एकमेकांना न बोलणारे शालिन भनोट आणि टीना दत्ता यांनी प्रेक्षकांना बघून असे काही केले की, सर्वांनाच मोठा धक्का बसला. बिग बाॅसच्या घरामध्ये राहण्यासाठी टीना आणि शालिन हे दोघेही फेक रिलेशन तयार करत असल्याचे घरातील सदस्यांचे आणि प्रेक्षकांचे म्हणणे आहे.

प्रेक्षकांना घरात पाहून शालिन आणि टीना एकमेकांच्या इतक्या जास्त जवळ आले की, हे पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. शालिन आणि टीनाचे ते रूप पाहून घरातील सदस्यांमध्ये देखील विविध चर्चा रंगल्या आहेत.

शोमध्ये टिकण्यासाठीच हे दोघे असे करत आहेत, हे आता स्पष्टच झाले आहे. शोदरम्यान झालेल्या या प्रकारानंतर बिग बाॅसने घरातील काही सदस्यांना या घडलेल्या प्रकाराबद्दल विचारण्यासाठी बोलावले होते.

यावेळी जवळपास सर्वांनाच शालिन आणि टीनाचे रिलेशन फेक असल्याचे आणि घरामध्ये राहण्यासाठी करत असल्याचे वाटत आहे. अर्चना शालिन आणि टीना यांच्यामध्ये घडलेल्या त्याप्रकारावर शालिनला विचारत होती.

यावर शालिन याने त्यांच्या रिलेशनवर उत्तर देण्याऐवजी अर्चना आणि साैंदर्याच्या रिलेशनवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. शालिनचे हे बोलणे ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला आहे.