बाॅलिवूडचा हा अभिनेता असता ‘जेठालाल’च्या भूमिकेत, या मोठ्या कारणामुळे अभिनेत्याने नाकारली भूमिका

| Updated on: Mar 21, 2023 | 7:54 PM

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र खास आहे. ही मालिका लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत जवळपास सर्वांचीच आवडती मालिका आहे. आता या मालिकेला पंधरा वर्ष झाले आहेत.

बाॅलिवूडचा हा अभिनेता असता जेठालालच्या भूमिकेत, या मोठ्या कारणामुळे अभिनेत्याने नाकारली भूमिका
Follow us on

मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका तब्बल पंधरा वर्षांपासून प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन करत आहे. या मालिकेमधील प्रत्येक पात्र खास आहे. या मालिकेची संपूर्ण स्टोरी ही एका सोसायटीवर आधारित आहेत. ही सोसायटी मुंबईमधील (Mumbai) गोरेगाव येथे असून अनेक जाती धर्माचे लोक या सोसायटीमध्ये राहतात, असे दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे विविध जाती धर्माचे लोक कशाप्रकारे एकत्र येत सर्व सण साजरे करतात हे देखील या मालिकेत दाखवले जाते. या मालिकेतील टप्पू सेना हा लहान मुलांचा आवडतीचा विषय आहे.

गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील अनेक कलाकार हे मालिकेला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. मालिकेमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून तारक मेहताचे पात्र साकारणारे शैलेश लोढा यांनी अचानक मालिका सोडली. इतकेच नाहीतर शैलेश लोढा आणि असित मोदी यांच्यामध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा आहेत.

दयाबेन अर्थात दिशा वकानी ही गेल्या काही वर्षांपासून मालिकेमध्ये दिसत नाहीये. दिशा वकानी मालिकेत परत कधी दिसणार हा प्रश्न सतत चाहते विचारताना दिसत आहेत. टप्पू के पापा, टप्पू के पापा हे शब्द ऐकण्यास चाहते आतुरत आहेत. मात्र, अजूनही बरेच कलाकार हे मालिकेच्या सुरूवातीपासूनचे कायम मालिकेमध्ये आहेत.

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत जेठालालचे पात्र पंधरा वर्षांपासून दिलीप जोशी साकारत आहे. जेठालाल यावर चाहते खूप प्रेम करतात. जेठालालच्या आयुष्यात समस्या कशा एका मागून एक येतात, हे मालिकेमध्ये दाखवण्यात आले आहे. जेठालालचे परममित्र तारक मेहता हे मालिकेत आहेत. जेठालाल प्रत्येक समस्या तारक मेहता यांच्याकडे घेऊन जातो.

दिपील जोशीला जेठालालच्या पात्रामुळे एक खास ओळख मिळालीये. मात्र, या पात्रासाठी सुरूवातीला बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काॅमेडी रोल करणारे राजपाल यादवला या पात्राची आॅफर देण्यात आली होती. मात्र, जेठालालचे पात्र साकारण्यास राजपाल यादवने नकार दिला होता. एका मुलाखतीमध्ये बोलताना राजपाल यादवने यावर भाष्य केले आहे.

राजपाल यादव म्हणाला, मला जेठालालच्या पात्रासाठी आॅफर आली होती. मात्र, त्यावेळी माझ्याकडे दुसरे काम सुरू असल्याने मी यासाठी नकार दिला होता. राजपाल यादवने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. कार्तिक आर्यन याचा नुकताच रिलीज झालेला शहजादा या चित्रपटात राजपाल यादव दिसला. बाॅलिवूडच्या चित्रपटात राजपाल यादव फुल काॅमेडी करताना कायमच दिसतो.