
इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटींच्या आत्महत्येच्या संख्येत मोठा वाढ होताना दिसत आहे. आता देखील एका प्रसिद्ध गायिकेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिका कल्पना राघवेंद्र हिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. कल्पना हिने हैदराबाद येथील राहत्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोतचे आणि गायिका तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या कल्पना हिच्यावर उपचार सुरु असून गायिकेला आता कोणताच धोका नाही.. अशी माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्पना हिने राहत्या घरी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी कल्पनाच्या अपार्टमेंटमधील रेजिडेंट्स एसोसिएशनने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तिच्या घरी पोहोचून घराचा दरवाजा तोडला. तेव्हा ती बेडवर बेशुद्ध अवस्थेत आढळली. कल्पना हिच्या घराचा दरवाजा दोन दिवस बंद असल्याचं कळताच सिक्योरिटी गर्ड्सने पोलिसांना सांगितलं. घटना घडली तेव्हा गायिकेचे पती चेन्नई येथे होते.
पोलिसांनी कल्पना ‘बेशुद्ध’ अवस्थेत सापडली त्यानंतर गायिकेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. केपीएचबी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कल्पनाने झोपेच्या गोळ्या घेतल्या. आता कल्पना याच्या जीवाला कोणताच धोका नाही. कल्पना शुद्धीवर आल्यानंतर इतर गोष्टी उघडकीस येतील. सध्या कल्पनाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
कल्पना यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या अवघ्या 5 व्या वर्षी कल्पनाने संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. 2010 मध्ये स्टार सिंगल मल्याळम जिंकला होता. यानंतर तिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. कल्पनाने अनेद दिग्गज संगीतकारांसोबत काम केले आहे. एवढंच नाही तर, आतापर्यंत 1500 हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत. एवढंच नाही तर, अनेक सिनेमांमध्ये कल्पना हिने अभिनय देखील केला आहे.
कल्पनाने काही दिवसांपूर्वी पासून अभिनय क्षेत्रातही पाऊल ठेवलं. 1986 मध्ये कमल हासनच्या ‘पुन्नागाई मन्नन’मध्ये ती कॅमिओमध्ये दिसली होती. याशिवाय ती ‘बिग बॉस तेलुगू’ (सीझन 1) ची स्पर्धकही राहिली आहे. 2024 मध्ये कल्पना हिने ‘केशव चंद्र रामावत’ या तेलुगु सिनेमातील ‘तेलंगणा तेजम’ या गाण्याला आवाज दिला.