Jacqueline Fernandez: 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलिनला मोठा दिलासा

| Updated on: Sep 26, 2022 | 1:09 PM

तुरुंगात जाण्यापासून जॅकलिनला तात्पुरता दिलासा; चौकशीचा ससेमिरा सुरूच राहणार

Jacqueline Fernandez: 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलिनला मोठा दिलासा
Jacqueline Fernandez
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई: 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) तात्पुरता दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) मुख्य आरोपी आहे. दिल्ली कोर्टाने जॅकलिनला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात काही दिवसांपूर्वीच जॅकलिनची चौकशी करण्यात आली होती. 50 हजारांच्या जातमुचलक्यावर दिल्लीतील पतियाळा कोर्टाने जॅकलिनला जामीन मंजूर केला. या प्रकरणातील पुढील चौकशी 22 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गेल्या आठवड्यात जॅकलिनची सात तास चौकशी केली होती. 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलिनची दुसऱ्यांदा चौकशी झाली होती. याआधीही दिल्ली पोलिसांनी तिला चौकशीसाठी समन्स बजावले होते.

आपल्यासाठी एक्स्क्लुसिव्ह कपडे डिझाइन करण्यासाठी फॅशन डिझायनर लिपाक्षीला तुरुंगात असलेल्या सुकेशने मोठी रक्कम दिल्याची कबुली जॅकलिनने चौकशीदरम्यान दिली. सुकेशवर दहा विविध प्रकरणांमध्ये गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जानेवारी 2021 पासून जॅकलिन आणि सुकेशची मैत्री सुरू झाली होती.

हे सुद्धा वाचा

सुकेशने जॅकलिनला महागडे भेटवस्तू दिल्या होत्या. चेन्नई आणि इतर ठिकाणांवरील हॉटेलमध्ये जॅकलिनने सुकेशची भेट घेतली होती. याचीही कबुली तिने चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांसमोर दिली. याप्रकरणा आता दिल्ली पोलीस जॅकलिनची स्टायलिस्ट लिपाक्षीचीही चौकशी करणार आहे.

सुकेशसोबतचे जॅकलिनचे इंटिमेट फोटोसुद्धा काही काळापूर्वी व्हायरल झाले होते. इतकंच नव्हे तर जॅकलिनला त्याच्याशी लग्न करायचं होतं. ही इच्छा तिने सर्वांत आधी अक्षय कुमार आणि सलमान खानसमोर बोलून दाखवली होती. मात्र या दोघांनी तिला सुकेशपासून लांब राहण्याबाबत बजावलं होतं.

जॅकलिनवर आपला प्रभाव पाडण्यासाठी सुकेशने तिला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. सुकेशच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे कानाडोळा करत जॅकलिन पुन्हा पुन्हा त्याच्याशी आर्थिक व्यवहार करत होती, असं ईडीने आरोपपत्रात नमूद केलं होतं.