
Archana Puran Singh: अभिनेत्री अर्चना पूरण सिंग हिने तिच्या युट्यूब चॅनलवर एक ब्लॉग पोस्ट केले आहे. ज्यामध्ये अर्चना रुग्णालयात असल्याचं दिसून येत आहे. जखमी अवस्थेत अर्चना रुग्णालातील बेडवर दिसत आहेत. ब्लॉगमध्या अर्चना अपघाताबद्दल सांगताना दिसत आहेत. सांगायचं झालं तर, अभिनेता राज कुमार राव याच्या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अर्चना घसरल्या आणि तिच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली. अर्चनाच्या चेहऱ्यावरही जखमा झाल्या. उपचारानंतर अर्चनाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
पुढे अर्चना हिने राज कुमार राव याला फोन केला आणि प्रॉडक्शनच्या विलंबाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ती म्हणाली, शक्य तितक्या लवकर कामावर परत येईल कारण तिला कोणाला आणखी त्रास द्यायचा नाही. या व्लॉगची सुरुवात अर्चना पहाटे पडल्या आणि जखमी झाल्याच्या प्रत्यक्ष फुटेजने झाली. क्रू मेंबर्स लगेच तिच्याभोवती जमले आणि तिला रुग्णालयामध्ये नेलं.
अर्चनाच्या मुलांनी या आईला दुखापत झाल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रियांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. दरम्यान, आईची अवस्था पाहून तिचा मुलगा भावूक झाला आणि रडू लागला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अर्चना हिची चर्चा रंगली आहे.
अर्चना म्हणाली, ‘मी आज राजकुमार राव याला फोन केला आणि सांगितलं शुटिंग सोडल्यामुळे त्रास होत आहे. त्यामुळे शुटिंग पूर्ण करण्यासाठी मी विरार येथे पोहोचली आहे, कारण त्यांना अधिक पैसे मोजावे लागतील. फार कमी वेळ शुटिंग चालणार आहे. काही तास फक्त त्यांना माझी गरज आहे…’ असं देखील अर्चना व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.
अर्चना हिने रुग्णालयात असल्याचं चाहत्यांना सांगितलं पण कोणत्या रुग्णालयात आहे… याबद्दल अभिनेत्री काहीही बोललेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना पूरण सिंग हिच्यावर मुंबईतील विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी तिच्या हातावर शस्त्रक्रिया केल्यानंतर ती आता पूर्णपणे बरी झाली आहे.