‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटातील तृतीयपंथीयाची भूमिका वादाच्या भोव-यात, कोणी केलाय विरोध ?, काय आहे कारण?

| Updated on: Feb 17, 2022 | 10:11 AM

आत्तापर्यंत मी अशा अनेक चर्चा ऐकल्या आहेत, त्यामुळं अशा भूमिका कुठून येतात हे दिग्दर्शकावर सगळं अवलंबून असतं. तसेच त्यांना तृतीयपंथीयाच्या भूमिकेसाठी विजय राज हे योग्य वाटले असावेत.

‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटातील तृतीयपंथीयाची भूमिका वादाच्या भोव-यात, कोणी केलाय विरोध ?, काय आहे कारण?
‘गंगूबाई काठियावाड़ी’
Follow us on

मुंबई – ‘गंगूबाई काठियावाडी’ (gangubai kathiawadi) चित्रपटाचा वाद काही केल्याने संपण्याचा मार्गावर नसल्याचे वारंवार पाहायला मिळत आहे. कारण या चित्रपटाला घेऊन आत्तापर्यंत अनेक वाद झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सुरूवातीला गंगूबाईच्या घरच्यांनी या चित्रपटावरती आक्षेप घेतला होता. त्यामुळे येणा-या 25 फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे, त्यावेळी अनेक वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाचा ट्रेलर (trailer) सोशल मीडियावर व्हायरल करत लोकांना चित्रपटाच्या रिलीजची तारिख सांगण्यात आली. पण त्याचं नंतर सुध्दा वादाला सुरूवात झाली आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात आलिया भट्ट (alia bhatt) ही मुख्य भूमिकेत दिसणार असून तृतीयपंथीयाची भूमिका अभिनेता विजय राज (vijay raj) यांनी केली आहे. त्यामुळे आता नवा वाद सुरू झाला आहे. अनेकांना त्यावर जाहीररीत्या टीका देखील केली आहे.

कोणी केलाय विरोध

‘गंगूबाई काठियावाडी’चित्रपटाचा वाद काही संपेना अशी परिस्थिती असताना आता विजय राज यांच्या भूमिकेबाबत लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला त्यानंतर त्यामध्ये विजय राज यांनी एका तृतीयपंथीयाची भूमिका केल्याची पाहायला मिळाली. त्यानंतर सोशल मीडियावर नव्या वादाला सुरूवात झाली. अनेकांनी विजय राजच्या जागी एखाद्या ख-या खु-या तृतीयपंथीयाला ती भूमिका दिली असती तर अधिक चांगलं झालं असतं असं म्हणटलं आहे. कारण इंडस्ट्रीमध्ये अनेक तृतीयपंथी आहेत ज्यांनी आत्तापर्यंत उत्तम अभिनय देखील केला आहे. या कारणामुळे तृतीयपंथी यांना चित्रपटात कमी संधी मिळत असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

अलिया भट्ट यांचं उत्तर

आत्तापर्यंत मी अशा अनेक चर्चा ऐकल्या आहेत, त्यामुळं अशा भूमिका कुठून येतात हे दिग्दर्शकावर सगळं अवलंबून असतं. तसेच त्यांना तृतीयपंथीयाच्या भूमिकेसाठी विजय राज हे योग्य वाटले असावेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडून ही भूमिका करून घेतली आहे. त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही. यांच्या आगोदर देखील चित्रपटांमध्ये वेश्या व्यवसाय करणारी भूमिका दाखवण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एक चांगली व्यक्तीरेखा पाहायला मिळेल. ही एका संघर्षाची कहाणी आहे हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर लक्षात येईल. गंगुबाईच्या घरच्यांनी सुध्दा गंगुबाईची चित्रपटात दाखवलेली भूमिका चुकीची असल्याचे म्हणाले आहेत. तसेच तीचं सगळ्या परिसरातील लोकांशी चांगले संबंध असल्याने तिला मॉ असा सगळा परिसर म्हणत होता असं त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे.

अमोल कोल्हे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, कोणत्या वाहिनीवर दिसणार मालिका

दिग्दर्शक, निर्माता, गायक, कवी, ‘बहुआयामी’ अभिनेता प्रसाद ओकचा आज 47 वा वाढदिवस, हॅपी बर्थ डे प्रसाद ओक!

ज्या आजारामुळे बप्पी लाहिरींनी जीव गमावला त्याची लक्षणे माहितीय का?