प्रसादने दोघात तिसरा आता सगळं विसरा, पूर्ण 3 धमाल, एक डाव धोबीपछाड, श्यामची आई, खेळ मांडला, गोळाबेरीज, कच्चा निंबू, शिकारी, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, फर्जंद, ये रे ये रे पैसा, हिरकणी, धुरळा अश्या 38 सिनेमांमध्ये अभिनेता म्हणून काम केलं आहे. हे काय नाय काय, कच्चा लिंबू, हिरकणी या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. प्रसादने दिग्दर्शित केलेले चंद्रमुखी आणि भद्रकाली हे सिनेमे यावर्षी प्रदर्शित होणार आहेत.