
मुंबई : मलायका अरोरा ही कायमच असते. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. मलायका अरोरा हिने अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून ती अर्जुन कपूर याला डेट करत आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसतात. हेच नाही तर काही दिवसांपूर्वी असे सांगितले जाते होते की, अर्जुन कपूर याच्या पहिल्या बाळाची आई ही मलायका अरोरा होणार आहे. मात्र, त्यानंतर अर्जुन कपूर याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला.
मलायका अरोरा झलक दिखला जा 11 मध्ये जजच्या भूमिकेत आहे. झलक दिखला जा 11 ची एक खास पार्टी नुकताच पार पडलीये. या पार्टीला अनेक कलाकार उपस्थित राहिले. सध्या पार्टीतील एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये सर्वजण धमाल करत आहेत. मात्र. यावेळी सर्वांचे लक्ष हे मलायका अरोरा हिच्याकडे जाताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा, शोएब इब्राहिम हे डान्स करताना दिसत आहेत. छैया छैया गाण्यावर मलायका अरोरा ही धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. मलायका अरोरा हिचा हा डान्स व्हिडीओ तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडताना दिसत आहे. ब्लॅक ब्रालेटमध्ये ग्लॅमरस लूकमध्ये मलायका अरोरा ही या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
विशेष म्हणजे मलायका अरोरा हिच्यासोबत डान्समध्ये शोएब इब्राहिम हा तिची साथ देताना दिसत आहे. मलायका अरोरा हिचा हा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून चाहते हे या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणत कमेंट करताना देखील दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा हिचा जलवा दिसतोय.
मलायका अरोरा हिच्या छैया छैया गाण्याने चांगलाच पारा वाढल्याचे बघायला मिळतंय. झलक दिखला जा 11 मध्ये अनेकदा मलायका अरोरा ही डान्स करताना दिसली. हेच नाही तर नोरा फतेही हिच्यासोबत देखील मलायका अरोरा हिने खास डान्स केला. मलायका अरोरा हिचा जेवतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला, ज्यानंतर तिच्यावर जोरदार टीका ही करण्यात आली.