
सुपरस्टार शाहरुख खान सोबत या अभिनेत्रीला मोठा ब्रेक मिळाला आणि एका रात्रीत ती सुपरस्टार झाली. मात्र, ऐन उमेदीत तो विचित्र अपघात घडला आणि या गोड हसणाऱ्या अभिनेत्रीच्या चेहऱ्यात कांचा घुसल्या.. त्यानंतर सर्जरीवर सर्जरी झाली..आता ही चाळीशीची अभिनेत्री पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आली आहे. या अभिनेत्रीने एका पुरस्कार सोहळ्यात आपली उपस्थिती दाखवत रसिकांसह झायद खान यालाही घायाळ केले आहे.
हो तुम्ही ओळखलं असेल आपण परदेस गर्लबद्दल बोलत आहोत. शाहरुख खानच्या परदेस चित्रपटातून रुपेरी पडद्यावर ब्रेक मिळालेली महिमा चौधरी तर रातोरात सुपरस्टार झाली. त्याकाळी तिला ओळीने एकामागोमाग अनेक मोठ्या बॅनरचे चित्रपट मिळाले होते. १९९९ची ही भयानक घटना आहे.दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या ‘ दिल क्या करे’ ची शुटींग सुरु होती. तेव्हा स्टुडिओला जाताना बंगळुरुजवळ एका ट्रकने महिमा चौधरी हीच्या कारला जोरदार धडक दिली. यामुळे काचचे ६७ तुकडे महिमाच्या चेहऱ्यात घुसले होते. त्यानंतर सर्जरी झाल्यानंतर तिने चित्रपटातून रामराम केला.
आता महिमा चौधरी पुन्हा एकदा लाईम लाईटमध्ये आली आहे. तिला शेवटचे इमर्जन्सी चित्रपटात प्रेक्षकांनी पाहीले होते. तिच्या कामाला लोकांनी पसंद केले होते. आता तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात महिमा अभिनेता झाएद खान याला भेटताना दिसत आहे. हा व्हिडीओ एका पुरस्कार सोहळ्याचा असल्याचे म्हटले जात आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
महिमा हिने झाएद खान याला अशा प्रकारे मिठी मारली तो प्रकार पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्याच तर झाएद खान सोबत गप्पा मारणाऱ्या तरुणीचा चेहराच पडला. या व्हिडीओ महिमा चौधरी खुपच सुंदर दिसत आहे. युजरने तिचे याबद्दल कौतूक केले आहे. या व्हिडीओला १० हजाराहून अधिक लाईक्स तासाभरातच मिळाले आहेत. एक महिमाचा चाहता म्हणाला काय ब्युटी आहे. तर दुसरा एक युजर म्हणाला, काय चालंलय काय ? तिसरा युजर म्हणाला की खुपच सुंदर दिसतेय..एकाने तर म्हटलेय मला तर परदेस चित्रपटातील महिमा आठवतेय…
महिमा हीने मॉडलिंग आणि काही टीव्ही कमर्शिअल मध्ये काम केल्यानंतर ‘परदेस’ चित्रपटातून बॉलीवुड डेब्यू केला होता. त्यानंतर तिने काही चित्रपटात लीड रोल केला होता.परंतू, एका अपघातानंतर तिचे करिअरवर परिणाम झाला होता. खाजगी जीवन खडतरच राहीले. तिने शेवटचा कंगणा रनौत सोबत इमर्जन्सी चित्रपट केला होता.
झायेद खान याचे कारकीर्द तर महिमा चौधरी हीच्यापेक्षाही कमी होती. प्रेक्षकांना ‘मैं हूं ना’ या चित्रपटात त्याचा अभिनय खूप आवडला होता. त्याने २००३ मध्ये ‘चुरा लिया है तुमने’ या चित्रपटातून पदार्पण केले. २००५ मध्ये त्याचे ४ चित्रपट प्रदर्शित झाले, परंतु त्यापैकी एकही चित्रपट ‘मैं हूं ना’ सारखा चमत्कार करू शकला नाही. काही चित्रपटांनंतर, त्याने मित्रांसोबत स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले. तो छोट्या भूमिकांमध्ये दिसला आहे.