
बॉलिवूडची सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री माधुरी दीक्षित अजूनही चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय, तिला डान्सिंग क्वीनही म्हणतात. आज आम्ही तुम्हाला अशा चेहऱ्यांची ओळख करून देणार आहोत जो चेहरा माधुरीच्या चेहऱ्यासारखा आहे.

'सैनिक' मध्ये दिसलेली अभिनेत्री फरहीनला कदाचित तिचे चाहते विसरले असतील. माजी क्रिकेटर मनोज प्रभाकरशी लग्नानंतर अभिनेत्रीनं चित्रपटांपासून निरोप घेतला होता. मात्र 90 च्या दशकातील ही अभिनेत्री माधुरी सारखी दिसते.

टीव्ही अभिनेत्री निक्की वालिया नेहमीच तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. निक्कीला माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी म्हटलं जातं. जर तुम्ही निक्कीच्या यंग एजचा फोटो पाहिला तर ती माधुरी सारखीच दिसायची.

बॉलिवूडमध्येच नाही तर माधुरी सारखी दिसणारी व्यक्ती हॉलिवूडमध्येसुद्धा आहे. वलेरिया गोलिनो ही ग्रीक इटालियन अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहे.

'हिना' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार्या अश्विनी भावेला चाहत्यांनी खूप पसंती दिली होती. त्यांना माधुरीच्या कार्बन कॉपीचा दर्जाही देण्यात आला होता. अश्विनीचा चेहरा चाहत्यांना माधुरीसारखा दिसतो. अश्विनी भावे बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर ठेवलं आहे.

सिंपल लुकिंग अंतरा मालीचादेखील या यादीमध्ये समावेश आहे. असं म्हणतात की अंतरा माधुरी दीक्षित होण्याचं स्वप्न घेऊन बॉलिवूडमध्ये आली होती.