
झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी बॉलिवूडमध्ये काही वर्ष काम केलं आणि सिनेविश्वाचा निरोप घेतला. अशाच अभिनेत्रींमध्ये एक अभिनेत्री आहे जिने सिनेमांमध्ये काम केलं. पण करियर फ्लॉप झाल्यानंतर तिने एका श्रीमंत व्यक्तीच्या मुलावर प्रेम आणि त्यानंतर लग्न केलं. आता ती अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसून स्वतःचा व्यवसाय करत आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अदिती आर्य आहे…
अदिती आर्य हिने 7 नोव्हेंबर 2023 मध्ये लग्न केलं. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. अदिती एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. अदिती हिने 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू सिनेमा ‘इस्म’ सिनेमातून करियरला सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने Seven, Kurukshetra, and Ninnu Vadili Nenu Polenule यांसारख्या दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केलं.
त्यानंतर अदिती हिने 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तंत्र’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘स्पॉटलाइट 2’ आणि फिल्म 83 मध्ये देखील अदिती दिसली. पण अभिनेत्री हवी तशी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली नाही, अदिती आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
28 मार्च 2015 रोजी, अदिती आर्यने फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2015 चा खिताब जिंकला आणि मिस वर्ल्ड 2015 मध्ये तिचे नशीब आजमावले. पण तिथे अदितीला अपयश स्वीकारावा लागला. अदिती प्रचंड सुंदर. तिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींचं ग्लॅमर देखील फिकं आहे.
आर्य अदिती हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीच्या पतीचं नाव जय कोटक आहे. जय कोटक हे कोटक हे महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. उदय कोटक यांच्या संपत्तीबद्दल झालं तर, त्यांच्याकडे 13.9 बिलियन डॉलर म्हणजे 12000 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
उदय कोटक यांनी 1985 मध्ये या कंपनीची स्थापना केली आणि 38 वर्षानंतर ती आता कोटक महिंद्रा बँक म्हणून ओळखली जाते आणि तिची किंमत 3,66,000 कोटी रुपये आहे.