3 कोटी बजेट अन् कमाई 20 कोटी, 45 वर्षे जुना चित्रपट, 67 आठवडे बॉक्स ऑफिसवर केलं राज्य, आजही लोक वेळ काढून बघतात चित्रपट
बॉलिवूड इंडस्ट्रीमधील 45 वर्षे जुना चित्रपट, ज्याने 96 दिवस बॉक्स ऑफिसवर केलं राज्य, प्रत्येक शो होता हाऊसफुल, 3 कोटींच्या बजेटमध्ये केली होती 20 कोटींची कमाई.

भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मनोज कुमार यांची कहाणी ही संघर्ष, देशप्रेम आणि यशाची प्रेरणादायी गाथा मानली जाते. 1947 च्या फाळणीने त्यांचं बालपण हादरलं. मनोज कुमार यांचं घर उध्वस्त झालं पण याच अनुभवातून त्यांच्या मनात देशासाठी अतूट प्रेम निर्माण झालं, जे पुढे त्यांच्या चित्रपटांचं मुख्य सूत्र बनलं.
24 जुलै 1937 रोजी जन्मलेल्या मनोज कुमार यांनी 1955 मध्ये अभिनेता होण्याचं स्वप्न घेऊन दिल्लीहून मुंबईत पाऊल ठेवलं. त्यांचा सुरुवातीचा प्रवास मात्र खडतर होता. 1956 मध्ये फॅशन आणि इतर चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका करत त्यांनी कारकीर्दीची सुरुवात केली. एका भिकाऱ्याच्या भूमिकेतून सुरुवात करणारा हा कलाकार पुढे ‘हरियाली और रास्ता’ या चित्रपटातून स्टार बनला. त्यानंतर ‘वो कौन थी?’ या थ्रिलर चित्रपटाने त्यांना अभिनेता बनवलं.
शेतकरी-सैनिकाची भूमिका
1965 हे वर्ष मनोज कुमार यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरलं. त्यांनी Shaheed हा भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित चित्रपट साकारला. हा चित्रपट पाहून तत्कालीन पंतप्रधानलालबहादूर शास्त्री प्रभावित झाले आणि त्यांनी ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेवर चित्रपट बनवण्याची सूचना केली. याच प्रेरणेतून 1967 मध्ये ‘उपकार’ हा चित्रपट आला.
या चित्रपटात मनोज कुमार यांनी ‘भारत’ नावाच्या शेतकरी-सैनिकाची भूमिका साकारली. ‘मेरे देश की धरती सोना उगले…’ हे गाणं आजही देशभक्तीची भावना जागवणारं मानलं जातं. या चित्रपटामुळे त्यांना ‘भारत कुमार’ ही ओळख मिळाली.
मोठं कर्ज घेऊन बनवला ऐतिहासिक चित्रपट
मनोज कुमार हे केवळ अभिनेता नव्हते तर ते लेखक, दिग्दर्शक आणि संपादकही होते. 1981 मध्ये त्यांनी मोठं कर्ज घेऊन क्रांती हा ऐतिहासिक चित्रपट बनवला. यात त्यांनी दिग्गज दिलीप कुमार यांना पुन्हा पडद्यावर आणलं. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला.
त्यांच्या योगदानासाठी मनोज कुमार यांना 2015 सालचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान 3 मे 2016 रोजी 63 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात देण्यात आला. आयुष्याच्या शेवटच्या काळात ते लिव्हर सिरोसिससारख्या गंभीर आजारांशी झुंज देत होते. अखेर 4 एप्रिल 2025 रोजी मुंबईतील रुग्णालयात त्यांचं निधन झालं.