याला म्हणतात चित्रपटाची कथा, ना कसलाही गाजावाजा, ना कोणतं प्रमोशन, या चित्रपटाच्या कमाईने बॉक्स ऑफिस हादरवलं

सर्वात कमी बजेट आणि सर्वात जास्त कमाई. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मोडले अनेक रेकॉर्ड. कमाईने बॉक्स ऑफिस हादरलं.

याला म्हणतात चित्रपटाची कथा, ना कसलाही गाजावाजा, ना कोणतं प्रमोशन, या चित्रपटाच्या कमाईने बॉक्स ऑफिस हादरवलं
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 11, 2026 | 5:15 PM

Thaai Kizhavi : चित्रपटसृष्टीत मोठे कलाकार आणि मोठे बजेट असलेले चित्रपटच हिट होतात अशी सर्वसाधारण समजूत असते. मात्र यावेळी तमिळ चित्रपटांमध्ये एक वेगळीच कथा पाहायला मिळाली आहे. 63 वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्री राधिका सरथकुमार यांच्या साध्या पण दमदार चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. मोठा सुपरस्टार नसतानाही आणि तिकीटांचे दर वाढवले नसतानाही या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकत थेट 50 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

या चित्रपटाचे नाव ‘थाई किझावी’ असून सध्या तमिळ चित्रपटसृष्टीत त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आणि मजबूत ‘वर्ड ऑफ माउथ’ यामुळे चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढत गेली.

बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी

‘थाई किझावी’ ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून चांगली पकड निर्माण केली. पहिल्या दिवशी चित्रपटाने सुमारे 80 लाख रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी कमाईत मोठी वाढ झाली आणि आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार-रविवारी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी वाढली.

वीकेंडला चित्रपटाने कोटींच्या घरात कमाई केली. विशेष म्हणजे आठवड्याच्या कामकाजाच्या दिवसांमध्येही चित्रपटाची गती कमी झाली नाही. अवघ्या 10 दिवसांत चित्रपटाने भारतात 35 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली.

ट्रेड रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने जगभरात 51 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. भारतात चित्रपटाचे ग्रॉस कलेक्शन 41 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले असून परदेशी बाजारातूनही चांगली कमाई झाली आहे. मर्यादित बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटासाठी ही कमाई खूप मोठी मानली जात आहे. कमी खर्च आणि जास्त कमाईमुळे निर्मात्यांना सुमारे 363 टक्के नफा मिळाल्याचे सांगितले जात आहे.


दमदार कथा

‘थाई किझावी’ हा ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा एका वयोवृद्ध आणि पूर्वी खूप स्वावलंबी असलेल्या महिलेभोवती फिरते. आजारपणामुळे ती आता अंथरुणाला खिळलेली असते. तिचे तीन मुले मात्र तिच्या मालमत्तेवर कब्जा करण्यासाठी तिला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.

या परिस्थितीतून चित्रपटात भावनिक प्रसंग आणि परिस्थितीजन्य कॉमेडी यांचे सुंदर मिश्रण पाहायला मिळते. राधिका सरथकुमार यांनी आपल्या प्रभावी अभिनयाने या भूमिकेला जीवंत केले असून प्रेक्षक त्यांच्या अभिनयाचे जोरदार कौतुक करत आहेत.

Follow Us