‘मिस वर्ल्ड 2024’च्या टॉप 8 मध्ये पोहचलेल्या सिनी शेट्टीला हा मोठा प्रश्न आणि तिथेच भंगले स्वप्न, तो प्रश्न..

Miss World 2024 : मिस वर्ल्ड 2024 च्या फिनालेकडे सर्वांच्या नजरा या बघायला मिळाल्या. हेच नाही तर हा फिनाले तब्बल 28 वर्षांनंतर भारतामध्ये पार पडतोय. यामुळे याबद्दल एक वेगळीच क्रेझ ही बघायला मिळाली. भारताची सिनी शेट्टी ही टाॅप 8 पर्यंत पोहचली. मात्र, तिला हा किताब आपल्या नावावर करण्यात यश मिळाले नाही.

मिस वर्ल्ड 2024च्या टॉप 8 मध्ये पोहचलेल्या सिनी शेट्टीला हा मोठा प्रश्न आणि तिथेच भंगले स्वप्न, तो प्रश्न..
| Updated on: Mar 12, 2024 | 11:53 AM

मुंबई : नुकताच भारतामध्ये मिस वर्ल्ड 2024 चा ग्रँड फिनाले पार पडलाय. या ग्रँड फिनालेकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या होत्या. मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये या फिनालेचे आयोजन करण्यात आले. देश विदेशातून लोक या फिनालेसाठी पोहचले होते. विशेष म्हणजे अनेक सेलिब्रिटी हे या सोहळ्यासाठी पोहचले होते. धमाकेदार परफॉर्म करताना अनेकजण दिसले. करण जोहर हा या फिनालेमध्ये सूत्रसंचालन करताना दिसला. तब्बल 28 वर्षांनंतर मिस वर्ल्डच्या ग्रँड फिनाले आयोजन हे भारतामध्ये करण्यात आले. भारताचे प्रतिनिधित्व सिनी शेट्टी ही करताना दिसली.

विशेष म्हणजे सिनी शेट्टी हिच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, मिस वर्ल्ड 2024 चा किताब आपल्या नावावर करण्यात सिनी शेट्टी हिला यश मिळाले नाही. टाॅप 8 पर्यंत पोहचण्यात सिमी शेट्टी हिला यश मिळाले. सिनी शेट्टी हिचे संपूर्ण शिक्षण हे मुंबईतच झाले हेच नाही तर तिचा जन्म देखील मुंबईत झालाय. लोक सिनी शेट्टी हिला सपोर्ट करताना देखील दिसले.

या स्पर्धेत सिनी शेट्टी 117 वेगवेगळ्या देशांशी स्पर्धा करत होती. सिनी शेट्टीने स्पर्धेत टिकण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केला आणि टॉप 8 स्पर्धकांच्या यादीत तिचा समावेश झाला. शोच्या होस्टने तिला एक प्रश्न विचारला ज्याचे उत्तर सिनीने पूर्ण आत्मविश्वासाने दिले. आता सिनीच्या उत्तराची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा प्रचार करता येईल अशा काही सूचना तुम्ही काय देऊ शकता का? हा प्रश्न सिमीला विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना सिनी शेट्टी ही म्हणाली की, सोशल मीडिया हा सध्या खूप जास्त शक्तिशाली आहे. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बदल घडवू शकतो आणि जनजागृती देखील करू शकतो.

यासाठी आपण जनरल झेडची देखील मदत घेऊ शकतो. हेच नाही तर मी स्वत: जनरल झेडचा एक भाग देखील आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करून महिलांना प्रोत्साहन नक्कीच दिले जाऊ शकते. एक माध्यम आणि बदण्याची शक्ती नक्कीच सोशल मीडियावमध्ये असल्याचे तिने म्हटले. सिनी शेट्टी ही सध्या तूफान चर्चेत आहे.