
मुंबई : भारतामध्ये यंदा आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चे आयोजन करण्यात आलंय. याची जोरदार तयारी सुरू असल्याचे देखील बघायला मिळतंय. अनेक क्रिकेट संघ (Cricket team) हे भारतामध्ये दाखल देखील झाले. यामध्येच आपल्या शेजारी असलेल्या पाकिस्तानचा क्रिकेट संघही भारतामध्ये दाखल झालाय. इतकेच नाही तर भारतामध्ये पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचे (Pakistan Cricket Team) जोरदार स्वागत करण्यात आले. काही लोक हे पाकिस्तानी खेळाडूंना पाहून आपला आनंद जाहीर करताना दिसले.
आता पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूंच्या स्वागताचे अनेक व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतंय. अनेकांना हा प्रकार अजिबातच आवडला नसल्याचे स्पष्ट दिसतंय. सीमेवर वाद सुरू असतानाच पाकिस्तानच्या खेळाडूंचे ज्याप्रकारे स्वागत भारतात केले, त्यावरून टिका देखील केली जातंय. खेळाडूंचे काही चाहते स्वागत करताना दिसत आहेत.
हे सर्व व्हिडीओ व्हायरल होत असतानाच आता शाहरुख खान याच्या रईस चित्रपटाचे डायरेक्टर राहुल ढोलकिया यांनी थेट मोठी मागणी केलीये. राहुल ढोलकिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीये. मात्र, राहुल ढोलकिया यांची ही पोस्ट नेटकऱ्यांना अजिबातच आवडली नसल्याचे स्पष्ट दिसतेय. या पोस्टमुळे ते नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्याचे बघायला मिळतंय.
Now that #Pakistani cricketers are officially here, can we also invite Pakistani actors to act in our films ? Or Musicians to perform?
— rahul dholakia (@rahuldholakia) September 28, 2023
राहुल ढोलकिया म्हणाले की, आता पाकिस्तानी क्रिकेटपटू अधिकृतपणे भारतात आले आहेत, आम्ही आमच्या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी पाकिस्तानी कलाकारांनाही आमंत्रित करू शकतो का? इतकेच नाहीतर पुढे राहुल ढोलकिया म्हणाले, संगीतकार ही त्यांचे शो करू शकतात? आता राहुल ढोलकिया यांची हिच पोस्ट व्हायरल होताना दिसतंय.
राहुल ढोलकिया यांचे हे बोलणे अनेकांना अजिबातच आवडले नाहीये. राहुल ढोलकिया यांच्या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान ही मुख्य भूमिकेत दिसली होती. इतकेच नाही तर तिचा रईस हा पहिला बाॅलिवूड चित्रपट ठरला. मात्र, तिला या चित्रपटाचे फार काही प्रमोशन वगैरे करता आले नाही. राहुल ढोलकिया यांच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट या गेल्या जात आहेत.