AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 : आधीच झाली भविष्यवाणी ‘ही’ टीम जिंकणार वर्ल्ड कप 2023

ICC Cricket World Cup 2023 मेगा इव्हेंटच्या विजेत्याबद्दल आधीच भविष्यवाणी झाली आहे. वनडे वर्ल्ड कपला अजून 7 महिने बाकी आहेत. भारतात यंदाचा वनडे वर्ल्ड कप होणार आहे.

World Cup 2023 : आधीच झाली भविष्यवाणी 'ही' टीम जिंकणार वर्ल्ड कप 2023
ICC Wordl cupImage Credit source: icc
| Updated on: Mar 21, 2023 | 12:59 PM
Share

World Cup 2023 : वनडे वर्ल्ड कप 2023 यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. यंदाचा वर्ल्ड कप भारतात होणार आहे. वर्ल्ड कप सुरु व्हायला अजून काही महिन्यांचा कालावधी बाकी आहे. मात्र त्याआधीच ICC च्या या मेगा इव्हेंटमधील विजेत्याबद्दल मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे. वर्ल्ड कपला अजून 7 महिने बाकी आहेत. कुठला संघ यंदा वर्ल्ड कपच विजेतेपद मिळवणार? त्या बद्दल भविष्यवाणी झाली आहे.

भारतात होणारा वर्ल्ड कप कुठली टीम उंचावणार? त्या बद्दल ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज ब्रेट ली ने भविष्यवाणी केली आहे. तो स्पोर्ट्स यारीशी बोलत होता.  भारतात होणाऱ्या या वनडे वर्ल्ड कपमध्ये दिग्गज टीम भिडणार आहेत.

कुठली टीम वर्ल्ड कप विजेतेपदाची प्रबळ दावेदार?

न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड या टीम्स विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत. भारताच वर्ल्ड कप विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे, असं ब्रेट ली ने म्हटलय. “वर्ल्ड कपमध्ये भारताला भारतात हरवणं कठीण आहे. टीम इंडियाला भारतीय परिस्थितीबद्दल जास्त माहित आहे. त्यामुळे भारतच वर्ल्ड कप 2023 विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे” असं ब्रेट ली ने म्हटलय.

WTC फायनल कोण जिंकणार?

ब्रेट ली ने वर्ल्ड कपशिवाय 7 जूनपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या विजेत्याबद्दलही भविष्यवाणी केलीय. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये इंग्लंडच्या केनिंगटनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. 7 जून ते 11 जून दरम्यान फायनल होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्याबद्दल ब्रेट ली च वेगळं मत आहे. इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलिया जिंकेल असं ब्रेट ली ला वाटतं. WTC फायनल कुठे होणार?

“भारताकडे चांगली टीम आहे. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल इंग्लंडच्या ओव्हल मैदानात खेळली जाणार आहे. इथली परिस्थिती ऑस्ट्रेलियाला जास्त अनुकूल आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया जिंकेल असं माझं भाकीत आहे” असं ब्रेट ली म्हणाला.

Follow Us
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या PRO बाबत
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या दिवंगत PRO बाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा