AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बॉर्डर 2’च्या नाकावर टिच्चून जबरदस्त कमाई केलेला हा मराठी चित्रपट OTT वर; कधी अन् कुठे?

या वर्षाच्या सुरुवातीला थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बजेटची रक्कम तर वसूल केलीच, पण त्यासोबत चांगला नफाही कमावला आहे.

'बॉर्डर 2'च्या नाकावर टिच्चून जबरदस्त कमाई केलेला हा मराठी चित्रपट OTT वर; कधी अन् कुठे?
हा मराठी चित्रपट OTT वर; कधी अन् कुठे? Image Credit source: Youtube
| Updated on: Feb 20, 2026 | 12:52 PM
Share

2026 या वर्षाच्या पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. थिएटरमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी या लोकप्रिय मराठी चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर होणार असल्याचं कळतंय. 1 जानेवारी 2026 रोजी हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. आता हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज झाला आहे. मराठी ZEE5 वर 27 फेब्रुवारी 2026 रोजी या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याचा आनंद, जिद्द, शाश्वतता आणि सांस्कृतिक अभिमान यांचा गौरव या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. समकालीन आव्हानांना सामोरं जाताना आपली मुळे आणि ओळख जपणाऱ्या एका मराठी शाळेचा आणि या शाळेशी संबंधित माणसांचा भावनिक प्रवास या चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

सचिन खेडेकर, अमेय वाघ, प्राजक्ता कोळी, क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर आणि कादंबरी कदम अशा उत्तम कलाकारांची मांदियाळी असलेल्या या चित्रपटाने थिएटरमध्ये प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळवलं. सशक्त कथानक, प्रभावी अभिनय आणि मराठी माध्यम शिक्षणसंस्थांना दिलेली भावनिक मानवंदना यामुळे ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास सज्ज झाला आहे. हा चित्रपट 27 फेब्रुवारी 2026 पासून केवळ मराठी ZEE5 वर पाहता येणार आहे.

याविषयी दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, “हा चित्रपट मराठी माध्यम शाळांचा आणि त्यांच्याशी जोडलेल्या भावनिक विश्वाचा उत्सव आहे. अभिमान, आपलेपणा आणि आपला भाषिक, सांस्कृतिक वारसा जपण्याचx महत्त्व या चित्रपटातून मांडण्यात आलं आहे. चित्रपटगृहांत प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रेम भारावून टाकणारं होतं. आता मराठी ZEE5च्या माध्यमातून असंख्य घरांपर्यंत आणि मनांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत आहे.”

या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्राजक्ता कोळीनेही तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणं, हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि समाधान देणारा अनुभव ठरला आहे. मराठी ही माझ्या घरी बोलली जाणारी भाषा आहे. माझं बालपण, आठवणी आणि आपलेपणाची भावना या सगळ्यांशी ही भाषा घट्ट जोडलेली आहे. मराठी कथाकथनात एक आपुलकी आणि प्रामाणिकपणा आहे, जो मनाला थेट भिडतो. इतका महत्त्वाचा आणि समकालीन आशय असलेल्या चित्रपटातून मी पहिलं पाऊल टाकत आहे, याबद्दल मला विशेष कृतज्ञता वाटते.”

Follow Us
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे