
बॉलीवूडच्या अनेक चित्रपटात अंडरवर्ल्डचा विषय साकारण्यात आला आहे. ज्यात गँगस्टरची कहाणी पडद्यावर आलेली आहे.या चित्रपटांना पसंद केले गेले. आम्ही तुम्हाला एक अशा चित्रपटाबाबत सांगणार आहोत, त्यात गँगस्टरची कहाणी कोणा अभिनेत्याने साकारली नव्हती. गँगस्टरच स्वत:या चित्रपटात काम करत होता. आश्चर्यकारक बाब म्हणजे सलमान खान याच्या हिरोईनने चक्क एका गँगस्टर सोबत एका चित्रपटात काम केले होते.
आपण चर्चा करत आहोत सलमानला पहिले यश मिळवून देणाऱ्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातील हिरोईल भाग्यश्री पटवर्धन हीची. तिने एका चित्रपटात चक्क रियल गँगस्टर सोबत काम केले होते. त्याच्यावर एक दोन नव्हे तर २० खूनाचा आरोप होता.
येथे पोस्ट पाहा –
भाग्यश्रीने या संदर्भात दूरदर्शन सह्याद्री वाहिनीला दिलेल्या एका मुलाखती सांगितले की आम्ही या चित्रपटाची शुटींग करत होतो. तेव्हा गँगस्टरबाबत माहीती ऐकून मी खूप घाबरली होते. परंतू हा गुन्हेगार जेव्हा सेटवर आला तेव्हा त्याला भेटून हळूहळू सर्व नॉर्मल झाले. आणि माझी भितीही कमी झाली.
भाग्यश्री हीने सांगितले की तो एक तेलगु चित्रपट होता. त्यास सरकारची मंजूरी घेऊन काही आरोपींना तुरुंगातून बाहेर आणले होते. कारण चित्रपट त्यांच्या जीवनावर होता. सेटवर एके दिवशी मला कळले की एक गँगस्टर येत आहे. ज्याने २० हून अधिक मर्डर केले आहेत. हे ऐकून मी घाबरले होते. या चित्रपटात मी एक पत्रकार बनली होते. ती गुन्हेगारांचे जीवन जनतेसमोर मांडत असते.
हा गँगस्टर माझा चाहता होता. कारण त्याची बहीण माझ्यासारखी दिसतेय असे त्याचे म्हणणे होते असेही भाग्यश्री हीने सांगितले. भाग्यश्रीने बॉलीवुड करीयरशिवाय तेलगु आणि तामिळ चित्रपटातही काम केले आहे. अभिनेत्रीने करीयर ऐन भरात असतानाच हिमालय दासानी याच्याशी लग्न केले. तिला दोन मुले आहेत.