हा प्रसिद्ध अभिनेता दररोज रात्री झोपण्याआधी पडतो पत्नीच्या पाया, कारण..

हा प्रसिद्ध अभिनेता दररोज रात्री झोपण्यापूर्वी त्याच्या पत्नीच्या पाया पडतो. कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये त्याने याविषयीचा खुलासा केला. यामागचं कारणही त्याने सांगितलं आहे. हे ऐकून सेटवरील इतर कलाकारसुद्धा भारावले.

हा प्रसिद्ध अभिनेता दररोज रात्री झोपण्याआधी पडतो पत्नीच्या पाया, कारण..
हा प्रसिद्ध अभिनेता दररोज रात्री झोपण्याआधी पडतो पत्नीच्या पाया
Image Credit source: Instagram
Updated on: Jul 21, 2025 | 2:47 PM

कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये ‘सन ऑफ सरदार 2’ या चित्रपटाची टीम पोहोचली होती. याच शोदरम्यान एका अभिनेत्याने त्याच्या खासगी आयुष्याविषयी खुलासा केला. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून रवि किशन होता. भोजपुरी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता रवी किशनने सांगितलं की, तो दररोज त्याच्या पत्नीच्या पाया पडतो. हे ऐकताच शोमधील प्रेक्षक आणि इतर सहकलाकारांनी त्याचं कौतुक केलं. या एपिसोडमध्ये कपिल रवी किशनला विचारतो की, “तुम्ही आजसुद्धा दररोज रात्री झोपण्यापूर्वी पत्नी प्रिती किशनच्या पाया पडता, हे खरंय का?” त्यावर अभिनेता म्हणतो, “होय, मी पाया पडतो. परंतु ती मला कधीच असं करू देत नाही.” यावर इतर कलाकार प्रतिक्रिया देतात.

परीक्षकांच्या खुर्चीत बसलेली अभिनेत्री अर्चना पुरण सिंह म्हणते, “ही चांगली गोष्ट आहे. काय समस्या आहे?” तर अभिनेत्री मृणाल ठाकूर कौतुकाने ‘ऑ…’ अशी प्रतिक्रिया देते. कपिलसुद्धा म्हणतो, “किती गोड.” हे सगळं ऐकल्यानंतर रवी किशन त्यामागचं कारणही सांगतो. “जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं, तेव्हासुद्धा ती माझ्यासोबत खंबीरपणे उभी राहिली. ती मला सोडून गेली नाही”, असं तो म्हणाला.

आयुष्यातील कठीण काळात पत्नीने खूप साथ दिल्याचं रवी किशन सांगतो. याविषयी तो पुढे म्हणतो, “ती माझ्या दु:खात साथीदार होती. जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते, काहीच नव्हतं, तेव्हापासून तिने माझी साथ सोडली नाही. आज मी जो कोणी आहे, तिच्यामुळे आहे. ती बिचारी माझ्यासोबत कायम राहिली. तिने ज्या प्रकारे मला सांभाळलंय, ते सर्व पाया पडण्याच्या लायकच आहे.” यावेळी अभिनेता अजय देवगण त्याची मस्करी करण्याचा प्रयत्न करतो. अजय त्याच्या उपरोधिक विनोदबुद्धीसाठी ओळखला जातो. रवी किशन यांच्या तोंडून पत्नीचं कौतुक ऐकल्यानंतर अजय म्हणतो, “माणूस जितका अपराधी असतो, तितकं जास्त तो पाया पडतो.” हे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो.

रवी किशनने 1993 मध्ये बालमैत्रीण प्रितीशी लग्न केलं. या दोघांना चार मुलं आहेत. रिवा, तनिष्क, इशिता या तीन मुली आणि सक्षम हा मुलगा आहे. त्यापैकी मुलगी रिवाने ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. तर इतर मुलं प्रसिद्धीझोतापासून लांब राहणंच पसंत करतात. रवी किशन लवकरच ‘सन ऑफ सरदार 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विजय कुमार अरोरा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सन ऑफ सरदार’चा हा सीक्वेल आहे.