अवघ्या 21 व्या वर्षी टिकटॉक स्टारचा मृत्यू; अपघातात गमावला जीव

आणखी एका टिकटॉक स्टारने घेतला अखेरचा श्वास; कार अपघातात 21 वर्षीय अली डूलिनचा मृत्यू

अवघ्या 21 व्या वर्षी टिकटॉक स्टारचा मृत्यू; अपघातात गमावला जीव
अवघ्या 21 व्या वर्षी टिकटॉक स्टारचा मृत्यू
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 14, 2022 | 8:18 AM

अमेरिका: टिकटॉक स्टार अली डूलिन हिचा सोमवारी एका कार अपघातात मृत्यू झाला. अमेरिकेतील फ्लोरिडा इथं हा अपघात झाला. टिकटॉक या ॲपवर तिचे दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. 21 वर्षीय अली ही इंस्टाग्रामवरही लोकप्रिय होती. सोशल मीडियावर डान्सचे व्हिडिओ पोस्ट करून तिला प्रसिद्धी मिळाली. अलीच्या निधनावर चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

अलीच्या आईने सोशल मीडियावर मुलीचे काही फोटो पोस्ट करत तिला श्रद्धांजली वाहिली. अलीच्या अपघाताचं नेमकं कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत. या कार अपघातात आणखी काही जणांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे.

अली डूलिनने इंस्टाग्रामवर तिचं युजरनेम अली स्पाइस (@alidspicexo) असं ठेवलं होतं. तर टिकटॉकवर ती @alidxo या नावाने ओळखली जायची.

इन्स्टाग्राम मॉडेल नेलीन ॲशलेनं अली डूलिनला ‘टिकटॉकची मुलगी’ असं म्हटलंय. अलीच्या आणखी एका मित्राने सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली. ‘मला अजूनही विश्वास बसत नाहीये. आताच तुझा 21 वा वाढदिवस साजरा केला होता. आयुष्य खूप विचित्र आहे’, अशी पोस्ट लेन फॅरेलनं लिहिली.

काही दिवसांपूर्वीच टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचं निधन झालं होतं. ती सुद्धा 21 वर्षांची होती. मेघा तिच्या डान्सचे आणि मोटीव्हेशनल व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करायची. अत्यंत कमी वयात तिचा सोशल मीडियावर चाहतावर्ग तयार झाला होता.

सोशल मीडियाने अत्यंत कमी वयात मेघाला स्टार बनवलं होतं. टिकटॉकवर मेघाचे 9 लाख 30 हजार फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवर 93 हजार आणि इन्स्टाग्रामवर 1 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.