Toxic Social Media Review: यशचा अॅक्शन अवतार भावला, पण ‘टॉक्सिक’ इथेच फसला; सोशल मीडियावर काय म्हणतायत प्रेक्षक?
Toxic Social Media Review: यश, कियारा अडवाणी, नयनतारा, तारा सुतारिया यांच्या भूमिका असलेला 'टॉक्सिक' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया येत आहेत, ते पाहा..

Toxic Social Media Review: कन्नड सुपरस्टार यशच्या बहुप्रतिक्षित ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटाने अखेर आज (26 ऑगस्ट 2026) थिएटरमध्ये एण्ट्री केली आहे. ‘केजीएफ: चाप्टर 2’नंतर तब्बल चार वर्षांनी यश मोठ्या पडद्यावर परतल्याने चाहत्यांमध्ये या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता होती. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून यशचा अभिनय, स्क्रीन प्रेझेन्स आणि अॅक्शन सीन्सचं कौतुक होत असलं तरी कथानक आणि भावनिक बाजूवर काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘टॉक्सिक’मध्ये यशचा अंदाज पुन्हा एकदा चाहत्यांना भावल्याचं सुरुवातीच्या प्रतिक्रियांमधून दिसत आहे. विशेषत: त्याची स्क्रीन प्रेझेन्स आणि अॅक्शन सीन्सची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. काही प्रेक्षकांनी सिनेमाच्या भव्य व्हिज्युअल्स आणि टेक्निकल क्वालिटीचंही कौतुक केलं आहे. ‘हा चित्रपट पूर्णपणे वाईट नाही. यशची स्क्रीन प्रेझेन्स दमदार असून कियारा अडवाणी आणि नयनतारा यांचाही लूक आणि स्क्रीन प्रेझेन्स प्रभावी आहे’ असं एकाने म्हटलंय. तर चित्रपटातील काही संवादांनाही प्रेक्षकांकडून दाद मिळत आहे.
Not a bad one definitely
But lack of emotional connection leaves you no impact
Most if time it feeks like viewing a Hollywood film such is the visual grandeur
Yash screeb presence is lit🔥🔥
Kiara is gorgeous and nayan screen presence 👌👌
Some of the dialogues🔥🔥👌👌#Toxic https://t.co/TcCV9rYabQ— Samurai reimei⚔️🌋 (@prakashraj_Jspk) August 25, 2026
या चित्रपटाबद्दलची सर्वांत मोठी टीका भावनिक कनेक्टच्या अभावावर होत आहे. काही प्रेक्षकांना भव्य व्हिज्युअल्स आणि अॅक्शन असूनही कथा मनाला भिडत नसल्याचं वाटलं. काही प्रतिक्रियांमध्ये स्क्रीनप्ले विस्कळीत असल्याचं आणि पात्रांची योग्य ओळख करून देण्यात अडचण येत असल्याचंही म्हटलं आहे. काही प्रेक्षकांनी तर चित्रपटाच्या कथानकावर ‘केजीएफ’चा प्रभाव अधिक जाणवत असल्याचं म्हटलं आहे. टेक्निकल क्वालिटी उत्तम असली तरी कथा आणि पटकथा तितकी प्रभावी नसल्याची प्रतिक्रिया काही प्रेक्षकांनी दिली.
#Toxic Very Messy 1st Half!
Apart from the technical quality, this one is all over the place so far. Heavy KGF hangover with a very clumsy and tiring screenplay. Even the action feels artificial with excessive mocobot usage, while the BGM is also a major letdown. Only the…
— Venky Reviews (@venkyreviews) August 25, 2026
सध्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया पूर्णपणे एकसारख्या नाहीत. काहीजण ‘टॉक्सिक’मधील अॅक्शन, स्टाइल आणि यशच्या स्क्रीन प्रेझेन्सवर फिदा झाले आहेत, तर काहींना कथा, पटकथा आणि भावनिक बाजूवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे हा चित्रपट पूर्णपणे मास एंटरनेटर ठरतो की नाही, हे प्रेक्षकांचा मोठा वर्ग हा सिनेमा पाहिल्यानंतरच स्पष्ट होईल.
‘टॉक्सिक’च्या प्रदर्शनाची तारीख दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. याआधी हा चित्रपट रणवीरच्या ‘धुरंधर 2’सोबत 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. त्यानंतर ही तारीख पुढे ढकलून 4 जून निश्चित करण्यात आली होती. परंतु 29 एप्रिल रोजी यशकडून पुन्हा तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. अखेर आज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.