थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोट मागे; त्रिशाची पोस्ट चर्चेत, ‘कसलीही फिकीर..’

Trisha Krishnan: तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांची पत्नी संगीताने घटस्फोटाची याचिका मागे घेतली आहे. त्यानंतर अभिनेत्री त्रिशा कृष्णनची इन्स्टा पोस्ट आणि त्यावरील कॅप्शन चर्चेत आलं आहे.

थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोट मागे; त्रिशाची पोस्ट चर्चेत, कसलीही फिकीर..
त्रिशा कृष्णन, थलपती विजय- संगीता
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 09, 2026 | 10:13 AM

तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय उर्फ थलपती विजय यांची पत्नी संगीताने त्यांच्याविरोधात दाखल केलेली घटस्फोटाची याचिका मागे घेतली आहे. चेंगलपट्टू जिल्हा कुटुंब न्यायालयाने संगीताची याचिका मागे घेण्याची विनंती स्वीकारून हे प्रकरण बंद केलं आहे. डिसेंबर 2025 मध्ये संगीताने विजय यांच्याविरोधात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. त्यावेळी संगीताने त्यांच्यावर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. या आरोपांदरम्यान अभिनेत्री त्रिशा कृष्णन आणि थलपती विजय यांच्यातील मैत्रीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. काही महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये दोघांना एकत्रसुद्धा पाहिलं गेलं होतं. आता संगीताने घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याने त्रिशाची इन्स्टा पोस्ट चर्चेत आली आहे.

त्रिशाने 29 जुलै रोजी इन्स्टाग्रामवर स्वत:चे काही फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘कशाचीही फिकिर न करणं ही एक निवड आहे, ती निवडा.’ हीच पोस्ट पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्रिशाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. ‘खरं प्रेम नेहमीच जिंकतं, तू आयुष्यात पुढे जा’, असं एकाने लिहिलं. तर ‘अखेर संगीता जिंकली’, असं दुसऱ्याने म्हटलं आहे. ‘प्रयत्न चांगला होता, पण नशिबाने साथ दिली नाही’, अशीही खोचक टिप्पणी नेटकऱ्याने केली आहे.

विजय मुख्यमंत्री होताच त्यांच्या घटस्फोटाच्या आणि त्रिशा कृष्णनसोबतच्या नात्याबद्दल विविध चर्चा होऊ लागल्या. तेव्हापासून विजय यांची आई शोभा चंद्रशेखर यांनी पुढाकार घेतला आणि सून संगीताशी संवाद साधायला सुरुवात केली. घटस्फोटाची याचिका दाखल केल्यापासून परदेशात राहायला गेलेली संगीता गेल्या महिन्यातच तमिळनाडूमध्ये परतली आहे. त्यानंतर शोभा आणि संगीता यांच्यात बंद दाराआड चर्चासुद्धा झाल्याचं कळतंय. त्यानंतर संगीताने घटस्फोट मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

मे महिन्यातच तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता. यात थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने मोठं यश मिळवलं होतं. तर निकालाच्या दिवशीच म्हणजेच 4 मे रोजी त्रिशाचा वाढदिवससुद्धा होता. त्यानंतर 10 मे रोजी विजय यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या शपथविधी सोहळ्यात त्रिशाने अत्यंत पारंपरिक अंदाजात हजेरी लावली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us