आशा भोसलेंचं हे गाणं ऐकताच स्टुडियोतून निघून गेलेले गीतकार, त्याच गाण्यामुळे ‘धुरंधर’ सिनेमा गाजला

Asha Bhosle : आशा भोसले यांचं असं एक गाणं, ऐकताच गीतकार स्टुडियोतून गेलेले निघून, नंतर ठरला ब्लॉकबास्टर... आज त्याच गाण्याने 'धुरंधर' सिनेमाला नेलं वेगळ्या उंचीवर

आशा भोसलेंचं हे गाणं ऐकताच स्टुडियोतून निघून गेलेले गीतकार, त्याच गाण्यामुळे धुरंधर सिनेमा गाजला
Asha Bhosale
| Updated on: Apr 12, 2026 | 9:29 AM

Asha Bhosle : प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी असंख्य सदाबहार गाणी गायली आहे. आजही आशा भोसले यांची गाणी रसिकांच्या तोंडावर असतात. एवढंच नाही तर, आशा भोसले यांनी ज्या गाण्यांना आवज दिली. त्यामधील काही गाण्याचे रिमिक्स देखील तयार करण्यात आले. आशा भोसले यांचं एक गाणं असं आहे जे ‘धुरंधर’ सिनेमात देखील गाजलं.. अशात तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, ते कोणतं गाणं आहे, जे त्याकाळात देखील दमदार हीट झालं आणि आज त्याच गाण्यामुळे धुरंधर सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे.

कोणतं आहे ते गाणं…

सध्या ज्या गाण्याची चर्चा रंगत आहे ते गाणं 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कारवा’ सिनेमातील आहे. ‘पिया तू अब तो आजा’ (Piya Tu Ab To Aaja) ‘कारवा’ सिनेतील आहे. तेव्हा देखील हे गाणं हीट ठरलेलं. पण या गाण्यामागे काय घडलेलं हे फार कोणाला माहिती नाही. आशा भोसले यांनी गाणं गाण्यास होकार तर दिला, पण आर. डी. बर्मन सतत बोल्ड गाणी देत ​​असल्याची त्यांनी तक्रार केली. पण हे गाणं हीट होईल असा विश्वास देखील संगीतकाराने आशा भोसले यांना दिलेला आणि तसंच झालं…

आशा भोसले म्हणालेल्या, ‘हे गाणं जेव्हा मी गात होती, तेव्हा गीतकार मजरूह सुल्तानपुरी स्टुडिओतून बाहेर निघून गेले कारण त्यांनी स्वतः लिहिलेल्या गाण्यावर त्यांना लाज वाटत होती…. मी गाणं रेकॉर्ड करण्यासाठी होकार दिलेला म्हणून गाणं गायलं.. पण माहिती नव्हतं की, गाणं इतकं हिट होईल..’

‘धुरंधर’ मध्ये रिमिक्स…

आशाताईंच्या या सदाबहार गाण्याचा रिमिक्स ‘धुरंधर’ बनवण्यात आला. रणवीर सिंग आणि सारा अर्जुनच्या बाईक राईड दरम्यान जेव्हा हे गाणं वाजलं, तेव्हा चित्रपटगृहांमध्ये प्रचंड शिट्ट्या वाजल्या, ज्यामुळे ते पुन्हा एकदा सुपरहिट ठरलं.
आशा भोसले यांच्या फक्त ‘पिया तू अब तो आजा’ या गाण्यामुळेच नाही तर, ‘दम मारो दम’, ‘हरे रामा हरे कृष्णा’ या गाण्यांवर देखील वाद झालेले. पण त्यांनी गायालेली सर्व गाणी हीट ठरली… आशा भोसले यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, आशा भोसले यांनी आठ दशकांपेक्षा मोठ्या करियरमध्ये अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहे.. त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आलं आहे. सध्या आशा भोसले त्यांच्या प्रकृतीमुळे चर्चेत आहेत.

Follow Us