
झी मराठी वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेची कथा, कलाकारांचं अभिनय आणि त्यात दाखवले जाणारे ट्विस्ट्स प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.

नुकताच या मालिकेत अक्षरा आणि अधिपती यांचा राजेशाही विवाह प्रेक्षकांनी अनुभवला. या दोघांच्या लग्नामध्ये आणि लग्नानंतरही अनेक अडचणी येताना दिसत आहेत. अशातच अक्षरा आणि अधिपती हे जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला जाणार आहेत.

या मालिकेच्या नवीन भागाचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये अधिपती अक्षराला उचलून जेजुरीचा गड चढताना दिसत आहे. या मालिकेच्या शूटिंगसाठी हे कलाकार खरोखरंच जेजुरीला गेले होते.

खंडोबाच्या देवळातील एक फोटो शिवानी रांगोळेनं सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये शिवानी पारंपारिक वेशभूषेत दिसत असून तिने कपाळावर भंडारा लावला आहे. येळकोट येळकोट जय मल्हार, असं लिहित तिने हा खास फोटो पोस्ट केला आहे.

तुला शिकवीन चांगलाच धडा ही या मालिकेचा जेजुरी विशेष भाग येत्या बुधवारी म्हणजेच 18 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. यामध्ये शिवानी रांगोळे आणि हृषिकेश शेलार हे दोघं मुख्य भूमिकेत आहेत.